-
मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
सोनाली सध्या तिचा पती कुणाल बेनोडेकरसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करत आहे. याचे अनेक फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
मालदीव हे स्वच्छ, निर्मळ आणि मन मोहून टाकणाऱ्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.
-
सोनाली मालदीवमध्ये कंदीमा (Kandima) रिसॉर्टमध्ये राहत आहे.
-
हे रिसॉर्ट दिसायला अतिशय सुंदर आणि प्रशस्त आहे.
-
कंदीमा रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी आठ पर्याय उपलब्ध आहे.
-
यातील हनिमून अॅक्वा पूल व्हिलामध्ये सोनाली तिच्या नवऱ्यासोबत राहत आहे.
-
या व्हिलामधून अथांग पसरलेला समुद्र दिसतो.
-
विशेष म्हणजे या व्हिलासोबत जोडूनच एक खासगी स्विमिंगपूलही देण्यात आला आहे.
-
सोनाली राहत असलेल्या हनिमून व्हिलाचे प्रतिदिवसाचे भाडे 2,455.88 डॉलर आहे.
-
भारतीय रुपयांनुसार हे भाडे साधारण दीड ते दोन लाखांच्या आसपास आहे.
-
मालदीवच्या कंदीमा रिसॉर्टमधील हनिमून व्हिलामध्ये जर तुम्ही दोन दिवस राहण्यासाठी गेलात तर, तुमचे दोन दिवसांचे चार्जेस साधारण 4 लाख 50 हजार 536 रुपये इतके होतात.
-
विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला दोन ते तीन महिने आधी बुकींग करावे लागते.
-
मात्र कंदीमा हे मालदीवमधील अतिशय स्टाइलिश रिसॉर्ट म्हणून ओळखले जाते.
-
यात २६४ स्टुडिओ रुम आणि व्हिला असून जेवणासाठी खास सुविधा आहे.

‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल