-
बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीचे लाखो चाहते आहेत. नर्गिसने रणबीर कपूरच्या 'रॉकस्टार' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
नर्गिस आज एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिला देखील अनेक कलाकारांप्रमाणे कास्टिंग काउचचा अनुभव आला होता. तिने एका मुलाखतीत तिला आलेल्या कास्टिंग काउचचा भयानक अनुभव सांगितला आहे.
-
नर्गिसने माजी पॉर्नस्टार ब्रिटनी डी ला मोरालाच्या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड आणि कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला आहे.
-
दिग्दर्शकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे तिला काही प्रोजेक्ट्स गमवावे लागले. तर या विषयी तिने या मुलाखतीत सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत.
'नर्गिसला पुढे जाऊन काय करायचे आहे हे तिला माहित होते. लोकप्रियता मिळालीच पाहिजे हा तिचा उद्देश नव्हता. यामुळेच कोणतीही गोष्ट करण्यासाठी ती तयार नव्हती. ती न्यूड किंवा कोणत्या दिग्दर्शकांसोबत शारीरिक संबंध ठेवणार नव्हती. तिच्या हातातून अनेक प्रोजेक्ट्स गेले आहेत, कारण तिने या गोष्टी करण्यास नकार दिला होता,' असे नर्गिस म्हणाली. पुढे नर्गिस म्हणाली, 'यामुळे मला खूप वाईट वाटले होते. कोणतीही गोष्ट करण्यासाठी माझ्या स्वत: च्या काही सीमा होत्या. माझे स्टॅ्न्डर्स होते. पण जेव्हा या गोष्टी करण्यास मी एकदा नाही तर परत परत नकार दिला तेव्हा मला सरळ बाहेर ढकलण्यात आलं, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. अखेर विजय हा चांगल्या व्यक्तीचा होतो. त्यांनी सांगितलेला मार्ग धरून कधीच जिंकण्याचा प्रयत्न करू नका, स्वत: चा मार्ग बघा आणि विजयी व्हा.' नर्गिसला 'प्ले बॉय' मॅग्झिनच्या फोटो शूटची देखील ऑफर आली होती. 'प्लेबॉय'च्या मॅग्झिनकडून मिळालेल्या ऑफर विषयी नर्गिस म्हणाली, तिला या मॅग्झिनसाठी विचारण्यात आले होते, मात्र तिने न्यूड फोटोशूटसाठी नकार दिला. जेव्हा नर्गिस मॉडेलिंग करत होती, तेव्हा तिला कॉलेज एडिशच्या प्लेबॉय मॅग्झिनसाठी विचारण्यात आले होते. तेव्हा तिच्या एजंटने सांगितले की त्यांना तरुण मुली पाहिजे आहेत. -
नर्गिसच्या एजेंटने तिला सांगितले की त्यांना तिला भेटाण्याची इच्छा आहे. 'प्लेबॉय' हे खूप मोठं आहे. त्यातून तिला खूप पैसे मिळाले असते. मात्र, नर्गिसने त्याला नकार दिला.
-
नर्गिसने 'मद्रास कॅफे', 'मैं तेरा हीरो', 'अझहर'सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर नर्गिसचा तोरबाज हा चित्रपट काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात नर्गिस संजय दत्तसोबत दिसली होती.
नर्गिसचे लाखो चाहते आहेत. नर्गिस सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नर्गिस तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या नर्गिस इटलीमध्ये असून सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या ट्रिपमध्ये नर्गिस वेगवेगळ्या डीश बनवताना दिसतं आहे. (All Photo Credit : Nargis Fakhri Instagram)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ