-
बिग बी गेल्या अनेक वर्षांपासून फ्रेंच कट दाढी ठेवत असल्याचं तुमच्या निदर्शनास आलं असेल. पण त्यांची ही स्टाइल केवळ फॅशन नाही, तर यामागे एक रहस्य आहे.
-
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनया व्यतिरिक्त आपल्या लुकमुळे सुद्धा ते साकारत असलेल्या भूमिका जिवंत करत असतात.
-
बिग बी यांच्या फ्रेंच दाढीमागचं रहस्य हे त्यांच्या चित्रपटाच्या संबंधित आहे. बिग बींनी स्वतः हा किस्सा शेअर केलाय.
-
‘रंग दे बसंती’, ‘भाग मिल्खा भाग’ अशा सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांचं नुकतंच प्रकाशित झालेल्या ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ या पहिल्या पुस्तकात बिग बींनी हा किस्सा शेअर केलाय.
-
बॉलिवूडते दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'अक्स' या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनी काम केलंय.
-
या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या पात्रानुसार फ्रेंच कट दाढीमध्ये ही भूमिका आखली गेली होती.
-
आपल्यापेक्षा अनुभवाने मोठा असलेल्या कलाकाराला हे सांगताना दिग्दर्शक राकेश यांना अवघडल्या सारखं जात होतं.
-
अमिताभ बच्चन यांनी 'अक्स' चित्रपटाची स्क्रीप्ट जहाजमध्ये बसून वाचायला घेतली होती.
-
स्क्रीप्ट वाचून अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी दिग्दर्शक राकेश खूपच उत्साहित होते. काहीसे चिंतेत ही होते.
-
ज्यावेळी बिग बींनी स्क्रीप्ट वाचली त्यावेळी त्यांनी विचारलं, "ही स्क्रीप्ट लिहीत असताना काय प्यायले होते?" दिग्दर्शक राकेश म्हणाले, "कोक आणि रम".
-
त्यावर अमिताभ बच्चन यांनी स्क्रीप्ट वाचून भूमिका करण्यासाठी होकार दिला.
-
त्यानंतर त्यांनी स्क्रीप्टनुसार आपला लुक देखील बदलला. त्यांना हा फ्रेंच कट दाढीमधला लुक इतका आवडला की आतापर्यंत त्यांनी हाच लुक ठेवलाय.
-
'अक्स' चित्रपटाला रिलीज होऊन १४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बिग बींनी हा किस्सा शेअर केला होता. (Photo : Instagram/amitabhbachchan)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख