-
करीना कपूर आणि सैफ अली खानच्या दुसऱ्या मुलाचं नाव समोर आलं आहे. करीना कपूरच्या 'प्रेग्नेंसी बायबल' या पुस्तकात तिच्या दुसऱ्या मुलाचं नाव 'जहांगीर' असल्याचं म्हंटलं आहे.
-
करीना कपूरच्या दुसऱ्या बाळाचं नाव जहांगीर असल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरताच आता नेटकऱ्यांमधून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
-
तैमूरच्या नावानंतर आता अनेक नेटकऱ्यांनी सैफिनाच्या दुसऱ्या बाळाच्या नावावर आक्षेप घेत करीना आणि सैफला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय.
-
करीनानच्या मुलाचं नाव जहांगीर असल्याचं कळाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाहायला मिळतोय.
-
करीना आणि सैफ मुघलांची टीम बनवत आहेत का? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
-
सैफिनाच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानंतर देखील ते चांगलेच ट्रोल झाले होते.
-
सैफ करीनाने भारतावर आक्रमण करणाऱ्या क्रूर तैमूर या प्रशासकाचं नाव का ठेवलं असं म्हणत नेटकऱ्यांनी सैफिनावर निशाणा साधला होता.
-
त्यानंतर आता सैफिनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय अशा चर्चा रंगत असतानाच दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर असल्याचं समजताच नेटकऱ्यांनी करीना कपूरवर टीका करण्यास सुरुवात केलीय.
-
तैमूर आणि जहांगीर नंतर आता सैफीना तिसऱ्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवणार असे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
-
. तर एक युजर म्हणाला, "करीना आणि सैफ मुलाचं नाव कलाम. इरफान, जाकीर काहीही ठेवू शकले असते. मात्र तैमूर आणि जहांगीर का ठेवलं? तर शिख आणि हिंदूंना कमी लेखण्याचा हा एक डाव आहे.असं वाटतंय करीना आणि सैफ मुघलांची आयपीएल टीम तयार करत आहेत."
-
जहांगीर हा मुघल साम्राज्याचा चौथा प्रशासक होता. जहांगीरने २२ वर्ष सत्ता गाजवली होती. तसचं त्याने शीख गुरू अर्जन देव यांना मृत्यूची शिक्षा दिली होती. यात जहांगीरचं नाव करीना आणि सैफने मुलाला दिल्याने अनेकांनी संताप व्यक्त केलाय.
-
या मीममध्ये 'थोडी तरी लाज बाळगा' असं म्हंटलं आहे.
-
तर 'माझा नंबर कधी येणार' असं औरंगजेब आता म्हणत असेल असं या मीममध्ये म्हंटलंय.
-
तर तैमूरच्या जन्मानंतर सैफ अली खानने टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं होतं. क्रूर प्रशासक असलेल्या त्या मुघलाचं नाव तिमूर होतं आणि माझ्या मुलाचं नाव तैमूर असल्याचं सैफ म्हणाला होता. (All Photos-twitter)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”