-
बॉलिवूडची बेबो करीना कपूरचा आज वाढदिवस आहे. करीना आज तिच्या कुटुंबासोबत तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
करीना कपूर खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून करीना तिचा धाकटा मुलगा जहांगीरमुळे चर्चेत होती.
-
त्याआधी करीना तिच्या पुस्तकामुळे चर्चेत आली आहे.
करीना कपूरच्या पुस्तकाचं नाव ‘करीना कपूर खान प्रेग्नेंसी बायबल’ आहे. करीनाने ९ ऑगस्ट रोजी तिचे हे पुस्तक दिग्दर्शक आणि खास मित्र करण जोहरसोबत इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत प्रकाशित केलं आहे. -
या वेळी करणने करीनाला तिच्या प्रेग्नेंसीच्या काळा विषयी प्रश्न विचारले. त्यावर करीनाने प्रेग्नेंसीमध्ये तिच्या आयुष्यात काय बदल झाले ते सांगितले आहेत.
-
प्रत्येक स्त्रीला गर्भधारणेवेळी वेगवेगळे अनुभव येत असतात. तर करीनासाठी गर्भधारणेची वेळी कशी होती. तिला किती अडचणी आल्या या विषयी करीनाने यावेळी सांगितले होते.
पहिल्या गर्भधारणेच्या तुलनेत दुसरी गर्भधारणा तिच्यासाठी कठीण होती असं म्हणत करीना म्हणाली, ‘दुसरी गर्भधारणा माझ्यासाठी खूप कठीण होती, तैमूरच्यावेळी मला इतका त्रास झाला नाही जितका जेहच्या वेळी झाला. जेव्हा मी पहिल्यांदा गर्भवती होते, तेव्हा सर्वकाही ठीक होत, मला चांगलं वाटत होतं.’ -
पुढे तो काळ तिच्यासाठी कसा होता हे सांगत करीना म्हणाली, ‘मला त्या वेळी खूप आनंद झाला. त्यामुळे मी पुढे दुसऱ्या बाळाचा विचार केला. पण दुसऱ्यांदा परिस्थिती बदलली. मला अनेक समस्यांचा सामना करवा लागत होता, त्यामुळे मला असे वाटत होते की मी हे करू शकणार नाही आणि भविष्यात काहीही ठीक होणार नाही.’
-
करीना पुढे तिच्या सेक्स लाइफ विषयीही बोलली आहे. ‘गर्भवती असताना पुरुषाने स्त्रीला आधार देणे गरजेचे असते. तिच्यावर सुंदर दिसण्यासाठी दबाव दिला नाही पाहिजे. जेव्हा आपण गर्भवती असतो तेव्हा दुसऱ्यांना वाटतं की आपल्याला सेक्सचा मूड आणि त्या भावना येत नाही. खरतंर आपल्याला माहित नसतं की आपल्याला काय वाटतं. त्यावेळी तुमच्या पतीला तुम्हाला आधार द्यावा लागतो आणि त्यावेळी सैफने मला खूप मदत केली.’
-
पुढे करीना सांगते की, ‘या काळात स्त्री स्वतःला खूप खास आणि सेक्सी समजत असते. अगदी सैफने देखील ही गोष्ट मान्य केली. गरोदरपणात करीना अतिशय सुंदर दिसत होती.’
-
एवढंच नव्हे करीना म्हणते की, ‘सहाव्या आणि सातव्या महिन्यात खूप थकवा जाणवतो. त्या काळात जोडीदाराचा किंवा जवळच्या व्यक्तीचा आधार असणे खूप महत्वाचे असते. अशावेळी आपल्या जोडीदाराने रेग्युलर सेक्स लाइफ सुपर ऍक्टिव असेल अशी आशा करणं चुकीचं आहे,’ अस देखील करीना म्हणाली.
‘गरोदरपणात स्त्रीच्या प्रत्येक महिन्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यावेळी सगळ्या गोष्टी या गरोदर स्त्रीच्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजे. जर ही गोष्ट तुमच्या नवऱ्याला कळत नसेल. तर तो तुमच्या मुलांचा बाप कसा असू शकतो? त्याला तुम्हाला सगळ्या बाजूने समजून घ्यायला हवं,’ असे करीना म्हणाली. -
करीनाने दुसऱ्या बाळाचं नाव ‘जेह’ ठेवल्याची चर्चा रंगली. मात्र करीनाच्या दुसऱ्या बाळाचं खरं नाव जेह नाही.
-
करीनाने ‘जहांगीर’ असं बाळाचं नाव ठेवलं आहे. जहांगीरला सोशल मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीना आणि सैफ करत आहेत.
-
जेह हा करीनासारखा दिसतो तर तैमूर हा सैफ सारखा दिसतो याचा खुलासा करीनाने एका मुलाखतीत केला होता. (Photo Credit : Kareena Kapoor Khan Instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”