-
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा आज वाढदिवस आहे. जॅकलिनने तिच्या सौंदर्याने आणि डान्सने अनेकांना घायाळ केलंय.
-
जॅकलिनचा जन्म १९८५ सालामध्ये बहरीनमध्ये झालाय. मात्र बॉलिवूडमध्ये येण्याआधी जॅकलिन काय करायची हे फार कमी जणांना ठाऊक असले. जॅकलिनच्या वाढदिवसानिमित्ताने आपण तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
-
जॅकलिनने सिडनीमधून मास कम्यूनिकेशनचं शिक्षण पूर्ण केलंय.
-
त्यानंतर जॅकलिन श्रीलंकेत परतली आणि तिने टीव्ही रिपोर्टर म्हणून काम सुरु केलं.
-
रिपोर्टिंग करत असतानाच जॅकलिनना मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या.
-
रिपोर्टिंग करत असतानाच जॅकलिनने मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर जॅकलिनने २००६ सालामध्ये मिस श्रीलंकाचा मुकुट पटकावला,
-
जॅकलिन मॉडेलिंग करण्यासाठी २००९ सालामध्ये भारतात आली . त्यानंतर तिला सुजॉय घोष यांच्या 'अलादीन'ची ऑफर मिळाली.
-
अभिनय क्षेत्रात पदार्पण करताच जॅकलिनला बॉलिवूड सिनेमांच्या ऑफर मिळू लागल्या.
-
अभिनयाशिवाय जॅकलिनला विविध पदार्थ बनवण्याची आवड आहे. एका मुलाखतीत तिने या गोष्टीचा खुलासा केला होता.
-
बॉलिवूडमध्ये आल्यानंतर दिग्दर्शक साजिद खानसोबत जॅकलिनचं नाव जोडलं गेलं होतं. त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चाही रंगू लागल्या होत्या.
-
नुकतचं जॅकलिनने मुंबईतील जुहू परिसरात नवं घरं घेतलं आहे. या घरी जॅकलिन तिच्या बॉयफ्रेण्डसोबत राहणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. जॅकलिनचा बॉयफ्रेण्ड एक उद्योगपती असल्याच्या चर्चा आहेत.(All Photos-Instagram@jacquelinef143)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख