-
बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ या क्यूट कपच्या अफेअरची चर्चा जोरात सुरूय.
-
गेल्या अनेक दिवसांपासून ते दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत आणि आता ते दोघे शेरशाहच्या स्कीनिंगमध्ये एकत्र दिसून आले.
-
शेरशाहचं स्क्रीनिंग पाहण्यासाठी विक्की आणि कतरिना दोघे एकत्र गेले होते.
-
स्क्रीनिंग संपल्यानंतर सुरूवातीला विक्की कौशल बाहेर पडताना दिसून आला. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ अभिनेत्री कतरिना सुद्धा तिची बहिण इसाबेलची वाट पाहून मग बाहेर पडली.
-
या दोघांच्याही लपाछपीचा एक व्हिडीओ आणि फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
-
बाहेर येताना जेव्हा त्याने कतरिनाकडे पाहिलं, त्यानंतर कतरिना मागे थांबताना दिसून आली. जणू काही विक्कीने कतरिनाला इशार करत थांबण्यासाठी सांगितलं असावं.
-
यात विक्कीने केलेल्या इशारानंतर कतरिना काही काळ पायऱ्यांवर लपताना दिसून आली. त्यानंतर काही वेळाने ती बहिण इसाबेलसोबत बाहेर येताना दिसून येते.
-
यात विक्कीने केलेल्या इशारानंतर कतरिना काही काळ पायऱ्यांवर लपताना दिसून आली. त्यानंतर काही वेळाने ती बहिण इसाबेलसोबत बाहेर येताना दिसून येते.
-
विक्की आणि कतरिनाचा हा लपाछपीचा खेळ पाहून फॅन्सनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स देण्यासाठी सुरूवात केलीय.
-
काही फॅन्सनी त्यांना बॉलिवूडमधली सर्वात सुंदर जोडी म्हटलंय. तर काही फॅन्सनी हा तर लपाछपीचा खेळ सुरूये असं म्हटलंय.
-
"कोणीतरी मीडियाला जोरात हाक दिली, नाहीतर दोघे एकत्र आले असते.", "विक्कीने इशारा केल्यानंतर कतरिनाने मास्क लावला" अशा वेगवेगळ्या कमेंट्स या व्हिडीओवर दिसून येत आहेत.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख