-
तुम्ही टीव्हीवर कधीतरी ती एका हॅण्डवॉशची जाहिरात नक्कीच पाहिली असणार ज्यामध्ये एक छोटी मुलगी तिच्या वर्गमित्राला, 'बंटी तेरा साबुन स्लो है क्या?' असा प्रश्न विचारते.
-
खरं तर या जाहिरातीवरुन अनेक मिम्सही शेअर झाल्याने नेटकऱ्यांना ही जाहिरात फार परिचयाची आहे.
-
मात्र या जाहिरातीमधील ही छोटी मुलगी आता सोशल नेटवर्किंगवर लोकप्रिय सेलिब्रिटी आहे असं तुम्हाला सांगितल्यास विश्वास बसणार नाही.
-
पण हे खरं आहे या जाहिरातीमधील छोटी मुलगी या वर्षी २० व्या वर्षात पदार्पण करणार आहे.
-
बंटीच्या स्लो साबणाची चौकशी करणारी ही मुलगी आज सोशल मीडिया स्टार आहे.
-
तुमचा विश्वास बसणार नाही पण या मुलीचे सध्या इन्टाग्रामवर २ कोटी २८ लाख ५२ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.
-
तर या मुलीचं नाव आहे अवनीत कौर.
-
अवनीत सध्या अभिनेत्री, मॉडल आणि डान्सर म्हणून सोशल नेटवर्किंगवर प्रचंड लोकप्रिय आहे.
-
अवनीतचा जन्म १३ ऑक्टोबर २००१ रोजी झाला.
-
पंजाबमधील जालंदरमध्ये तिचा जन्म झाला. नंतर तिचे पालक मुंबईला स्थायिक झाले.
-
अवनीतच्या आईचे नाव सोनिया नंदरा तर वडिलांचे नाव अमनदीप नंदरा आहे.
-
अवनीतने 'सब टीव्ही'वरील 'अलादीन- नाम तो सुना होगा' या मालिकेमध्ये प्रिन्सेस यास्मिनची भूमिका साकारली होती.
-
दोन वर्ष ही भूमिका साकारल्यानंतर आरोग्याच्या कारणांमुळे अवनीतला ही मालिका सोडावी लागली होती.
-
त्याचबरोबर अवनीतने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत.
-
अवनीतच्या काही गाजलेल्या मालिकांबरोबरच तिने अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्येही नाम कमावलं आहे.
-
अवनीत डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर, डान्स के सुपरस्टार्स, झलक दिखला जा सारख्या कार्यक्रमांमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
'मेरी माँ', 'सावित्री', 'एक मुठ्ठी आसमान', 'हमारी सिस्टर दीदी', 'ट्विस्टवाला लव्ह' सारख्या मालिकांमध्ये अवनीतने काम केलं आहे. -
तसेच 'लगे रहो चाचू', 'क्राइम पेट्रोल', 'चंद्रा नंदिनी', 'कुछ स्माइल हो जाऐ'सारख्या कार्यक्रमांमधून झळकली आहे.
-
'सब टिव्ही'वरील 'टेढ़ा है पर मेरा है'मध्येही अवनीत झळकली होती.
-
मालिकांमधील तिच्या कामाचं फार कौतुक झाल्याचं पहायला मिळालं.
-
तर 'मर्दानी', 'करीब करीब सिंगल', 'एकता', 'चिडियाखाना', 'मर्दानी २' सारख्या चित्रपटांमध्येही अवनीत झळकली आहे.
-
'झी फाइव्ह'वरील 'बाबर का ताबर' या वेब सिरीजच्या दोन्ही भागांमध्ये अवनीतने काम केलं आहे.
-
तसेच 'बंदीश बॅण्डइट'मधील एका गाण्यामध्ये अवनीतने गेस्ट अपेरन्स केलाय.
-
इतकच नाही तर ती असंख्य म्युझिक व्हिडीओंमधूनही प्रेक्षकांच्या भेटीस वेळोवेळी येत असते.
-
अवनीतने आता आपल्याला जास्तीत जास्त वेब सिरीज करायच्या असल्याचं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
-
टीव्ही मालिकांपेक्षा आपण आता वेब सिरीजला प्राधान्य देणार असल्याचं ती म्हणाली होती.
-
मालिकांमधील कामासाठी अवनीतला काही पुरस्कारही मिळाले आहेत.
-
१९ व्या वर्षीच अवनीतला 'मोस्ट स्टायलिस्ट इन्फ्यूएन्सर' हा पुरस्कारही मिळालाय.
-
२०२० साली तिला गोल्ड ग्रॅम अॅण्ड स्टाइल अवॉर्ड्समध्ये सर्वोत्तम इन्फ्यूएन्सर हा पुरस्कार मिळालाय.
-
तिच्या फॉलोअर्सची संख्या पाहता ही अगदी योग्य निवड आहे असं म्हणता येईल.
-
सोशल मीडियावर ती स्वत:चे अनेक फोटो पोस्ट करताना दिसते.
-
तिच्या फोटोंवर हजारोंच्या संख्येने लाइक्सचा पाऊस पडतो.
-
अवनीतने वयाच्या १० व्या वर्षापासून अभिनय क्षेत्रातील आपलं करियर सुरु केलं.
-
अवनीत टिक-टॉकवरही प्रचंड लोकप्रिय होती. मात्र आता या प्लॅटफॉर्मवर भारतात बंदी घालण्यात आलीय.
-
अवनीतचं नाव टीव्ही अभिनेता सिद्धार्थ निगमशी जोडलं जातं.
-
मात्र अवनीत सांगते त्याप्रमाणे त्या दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री असून अशापद्धतीच्या चर्चा ऐकायला आवडत नाही.
-
सध्या अभिनय क्षेत्रासोबतच अवनीत कांदिवलीमधील एका खासगी कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेत आहे.
ती कॉमर्सच्या पदवीचा अभ्यास करत आहे. -
द टाइम्सच्या मोस्ट डिझायरेबल वुमन ऑन टीव्ही २०२० च्या यादीमध्ये अवनीत १३ व्या स्थानी होती.
-
तर चंढीगड टाइम्स मोस्ट डिझायरेबल वुमन २०२० च्या यादीत अवनीत ११ व्या स्थानी आहे.
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून अवनीत आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड असते.
-
तिच्या व्हिडीओंनाही सोशल मीडियावर चांगल्या प्रतिक्रिया मिळतात.
-
अनेकदा ती आपले ग्लॅमरस फोटो सोशल नेटवर्किंगवरुन पोस्ट करत असते.
-
फोटो शूटमधील अनेक फोटो ती इन्स्टाग्रामवरुन शेअर करताना दिसते.
-
एकंदरितच अवनीतचे हा मॉडर्न लूक पाहिल्यावर ती लोकप्रिय जाहिरात फारच जुनी झाल्याची जाणीव होते. (सर्व फोटो अवनीतच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल