-
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि तितकंच नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर.
-
सई तिच्या बोल्ड आणि मादक अदांसाठी आता मराठीबरोबरच हिंदी चित्रपट सृष्टीमध्येही ओळखली जातेय.
-
मुळची सांगलीची असलेल्या सईचा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक आहे.
-
मराठामोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या फार चर्चेत आहे. सईने भूमिका साकारलेल्या 'नवरस' या नेटफ्लिक्सवरील वेब सिरीजचीही सध्या चांगलीच चर्चा सुरुय.
या वेब सिरीजमध्ये सई दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत झळकणार असून तिने त्याच्यासोबतचा हा फोटोही इन्स्टाग्रामवरुन शेअर केला होता. -
सई काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या क्रिती सेनॉनच्या 'मीमी' चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती.
-
या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झाल्याचं पहायला मिळालं.
-
सईने साकारलेलं पात्र हे सर्वांनाच फार आवडल्याचं समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच सांगितलं.
-
चित्रपटांबरोबरच सई दर आठवड्याला महाराष्ट्राची हास्यजत्रामधून परिक्षक म्हणून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
-
परिक्षक म्हणून या मालिकेत हजेरी लावणारी सई तिच्या ग्लॅमरस लुक्स आणि ड्रेसमुळे कायमच चर्चेत असते.
-
सईच्या अदांबरोबरच आणखीन एक गोष्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेते ती म्हणजे तिच्या उजव्या खांद्यावर असणारा टॅटू.
-
सईच्या खांद्यावरील हा टॅटू तिच्या अनेक फोटोंमध्ये दिसून येतो.
-
टॅटूचा आकार आणि वेगळेपणामुळे लगेच समोरच्या व्यक्तीचं लक्षं वेधलं जातं.
-
सई ताम्हणकरला टॅटूची फार आवड आहे. तिने तिच्या खांद्यावर रोमन लिपीत दोन तारखा गोंदल्या आहेत.
-
सई कनसेप्ट टॅटूजची मोठी फॅन आहे.
-
सईने एकूण चार टॅटू काढून घेतले आहेत.
-
सईने खांद्यावर रोमन लिपीत दोन तारखा गोंदल्या आहेत, ज्या तिच्यासाठी फार खास आहेत.
-
सईच्या खांद्यावरील या टॅटूमधील आकडे एप्रिल महिन्यातील दोन तारखा दर्शवतात.
-
२७ आणि सात एप्रिल असा सईच्या खांद्यावरील टॅटूचा अर्थ आहे.
या दोन्ही तारखा माझ्यासाठी फार महत्वाच्या आहेत असं सईने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. -
अमेय गोसावी सई ताम्हणकरने २०१३ मध्ये व्हिज्युअल आर्टिस्ट अमेय गोसावीशी लग्न केलं होतं.
-
मात्र सई आणि अमेयचं लग्न केवळ दोनच वर्ष टिकलं. २०१५ मध्ये सईने अमेयला घटस्फोट दिला.
-
माझे सर्व टॅटू हे अमेयसोबतच्या नात्यासंदर्भातील असल्याचंही सईने सांगितलं होतं.
-
तिच्या खांद्यावरील दोन तारखांपैकी एक तारीख लग्नाची आहे.
-
तर दुसरी तारीख ही अमेयने प्रपोज केलेल्या दिवसाची आठवण म्हणून तिने खांद्यावर गोंदवलीय.
-
सईच्या मानेवर तिच्या पतीचं म्हणजेच अमेयचं नाव गोंदवलेलं आहे.
हे नाव हिब्रू लिपीमध्ये गोंदवलेलं आहे. -
सईच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर स्टारचा टॅटू आहे.
-
सईच्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटावर HBPHG असं गोंदवलं आहे.
-
HBPHG ही हीप हॉप डान्स प्रकारातील एक स्टेप असून ही अमेय आणि सईची आवडती स्टेप आहे.
-
सध्या सईच्या इंडियन लॉकडाउन या चित्रटाचं चित्रिकरण सुरु आहे. (सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर / इन्स्टाग्राम)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन