-
हनी सिंग हे तसं संपूर्ण बॉलिवूडला ठाऊक असणारं आघाडीचं नाव सध्या नको त्या कारणांमुळे चर्चेत आहे.
-
आपल्या गाण्यांबरोबरच सोशल मीडियावरील पोस्ट आणि कॉनसर्टमुळे चर्चेत असणारा हनी सध्या चर्चेत येण्यामागी कारण आहे त्याची पत्नी शालिनी तलवार.
-
हनीवर तिने अगदी प्रेमात पडल्यापासून ते अगदी लैंगिक संबंध आणि त्यानंतर आपली झालेली फसवणूक असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकच नाही तर शालिनीने हनीच्या वडिलांवर म्हणजे सासऱ्यांवरही गंभीर आरोप केलेत. ज्यानंतर हनीनेही या आरोपांवर उत्तर दिलं आहे. नक्की या दोघांनी एकमेकांवर काय आरोप केलेत, या दोघांचं एकमेकांबद्दल काय म्हणणं आहे ते आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत.
-
हनी सिंगच्या विरोधात पत्नी शालिनी तलवारने छळ, मारहाण केल्याची याचिका दाखल केली आहे.
-
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण करणाऱ्या कायद्यांतर्गत शालिनीने हनी सिंगविरोधात तक्रार नोंदवली आहे.
-
माझा नवरा माझ्यावर अत्याचार करतो, माझं मानसिक आणि आर्थिक शोषण करतो असं शालिनीने तक्रारीत म्हटलं आहे.
-
हनी सिंगच्या आई वडीलांनी आणि छोट्या बहिणीनेही आपल्यावर अत्याचार केल्याचं शालिनीने तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
-
शालिनीने हनी सिंगबरोबरच त्याचे पालक आणि बहिणीविरोधात १६० पानांची याचिका दाखल केलीय.
-
या याचिकेमध्ये शालिनीने १० वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर हनीमूनदरम्यान घडलेल्या एका घटनेचाही उल्लेख केला आहे. ही घटना यापूर्वी कोणालाही ठाऊक नव्हती.
-
हनी सिंग हा सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील आघाडीचा गायक आहे.
-
हनी सिंगने गायलेली अनेक पार्टी साँग्स जबरदस्त हीट झालेली आहेत.
-
या पूर्वीही हनी सिंग रिहॅब सेंटरपासून इतर काही प्रकऱणांमुळे चर्चेत आला होता.
-
मात्र कधी फारश्या चर्चेत नसणाऱ्या त्याच्या पत्नीमुळे आता तो प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
-
हनी आणि शालिनी दोघेही सोशल नेटवर्किंगवर लग्नाचे वाढदिवस आणि वाढदिवसांना एकमेकांचे फोटो पोस्ट करतात.
हनी सिंगच्या पत्नीने त्याच्याविरोधात थेट याचिका दाखल केलीय. शालिनी तलवारने न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये हनी आणि आपली ओळख शाळेपासूनची असल्याचं म्हटलं आहे. शाळेपासून आमचे प्रेमसंबंध असल्याचं तिने म्हटलं आहे. -
१० वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर १४ मार्च २०१० रोजी हनी आणि शालिनीने घरच्यांच्या संमतीने साखरपुडा केला. त्यानंतर २३ जानेवारी २०११ रोजी सरोजनी नगरमधील गुरुद्वारामध्ये लग्न केलं.
-
हनी सिंगला लोकप्रियता मिळण्याच्या आधीपासूनच संगीत क्षेत्राची आवड होती. शालिनीनेही त्याला अगदी सुरुवातीच्या काळापासूनच त्याची ही आवड जोपसण्यासाठी मदत केली.
-
लग्न झालेलं असतानाही हनी सिंगला आपल्या लग्नासंदर्भात जगाला कळावं असं वाटत नसल्याचंही शालिनीने म्हटलं आहे.
-
हनी सिंगला लग्न सार्वजनिक करायचं नव्हतं म्हणून त्याने साखरपुड्याला त्याला घातलेली हिऱ्याची अंगठीही काढून ठेवली होती.
-
हिरा घालणं माझ्यासाठी चांगलं नसल्याचं कारण देत हनी सिंगने साखरपुड्याची अंगठी वापरणं बंद केल्याचं शालिनीचं म्हणणं आहे.
-
लग्न झाल्यानंतर ३ वर्ष हनी सिंगच्या चाहत्यांना त्याच्या लग्नासंदर्भात काहीच माहिती नव्हती.
-
२०१४ साली हनी सिंगने पहिल्यांदा जाहीरपणे आपल्या पत्नीसंदर्भात चाहत्यांना सांगितलं होतं.
-
कोणत्याही कॉन्सर्टला किंवा टूरला हनी सिंगसोबत जाण्यासाठी शालिनी विचारणा करायची तेव्हा तो तिला बेदम मारहाण करायाच असाही उल्लेख याचिकेत आहे.
-
आपल्या याचिकेमध्ये शालिनीने लग्नानंतर दोघेही हनीमूनसाठी मॉरिशयला गेल्याचा उल्लेख केलाय. या ट्रीपदरम्यानच हनी सिंगने पत्नीवर हात उचलण्यास सुरुवात केल्याचं याचिकेत म्हटलं आहे.
-
हनीमूनच्या वेळेस मला हृदेश सिंग म्हणजेच हनीने मारहाण केल्याचा दावा शालिनीने आपल्या आरोपांमध्ये केलाय. तेव्हापासूनच तो आपला छळ करत असल्याचंही तिने म्हटलं आहे.
-
दोघेही हनीमूनसाठी मॉरिशियसला पोहचले तेव्हा हनी सिंगच्या स्वभावामध्ये बदल झाल्याचं मला जाणवलं. तो फार शांत आणि गप्पगप्प राहू लगाला. यासंदर्भात शालिनीने विचारलं असता तो संतापला आणि त्याने तिला बेडवर धक्का दिला. हा फोटो दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या १६० पानांपैकी एका पानाचा आहे ज्यात या घटनेचा उल्लेख आहे.
-
रागावलेल्या हनी सिंगने शालिनीला बेड ढकललं. त्यानंतर तो तिच्या जवळ जाऊन ओरडू लागला.
-
"यो यो हनी सिंगला प्रश्न विचारण्याची कोणी हिंमत करत नाही, त्यामुळे तू पण मला या पुढे काही प्रश्न विचारायचे नाहीत," असं हनी सिंग आपल्याला ओरडून म्हणाल्याचं शालिनेने तक्रारीत म्हटलंय.
-
मी या लग्नामुळे चिंतेत आहे. मला लग्न करायचं नव्हते. मात्र मी तुला शब्द दिलेला म्हणून लग्न केल्याचंही हनी सिंगने म्हटल्याचा दावा शालिनीने केलाय.
-
१० वर्ष रिलेशनशिपमध्ये राहून लग्न केल्यानंतरही पतीकडून हे ऐकल्यानंतर शालिनीला मानसिक धक्का बसला. मात्र पत्नीला मारहाण करुन आणि रागारागात बरंच काय काय बोलून हनी हॉटेल रुममधून निघून गेल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.
-
या मारहाणीनंतर हनी सिंग जवळजवळ १२ तास हॉटेलमध्ये परतला नव्हता. त्यानंतर तो परतल्यावर शालिनीने त्याला कुठे गेला होता, मला एकटीला सोडून का गेला असे प्रश्न विचारले असता त्याने तिला मारहाण केली आणि नंतर केस ओढून, कानाखाली मारल्याचाही उल्लेख तक्रारीमध्ये आहे.
-
या घटनेनंतर हनी सिंग आणि शालिनीमधील संबंध कमालीचे ताणले गेले. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरुन साभार)
-
शालिनीने “मला एखद्या प्राण्यासारखं क्रूरपणे वागणूक देण्यात आली,” असं म्हणत हनी सिंगच्या कुटुंबियांवरही आरोप केले आहेत. शालिनीने दाखल केलेल्या याचिकेत तिने हनी सिंगच्या वडिलांवर म्हणजेच तिच्या सारऱ्यांवर देखील काही धक्कादायक आरोप केले आहेत. ती म्हणाली, “एकदा सासरे दारुच्या नशेत मी कपडे बदलत असताना माझ्या रुममध्ये आले आणि त्यांनी माझ्या छातीवरून हात फिरवला,” असा आरोप शालिनीने केलाय. शालिनीने तिच्यावर झालेल्या हिंसाचाराचे तिच्याकडे पुरावे असल्याचा दावा केलाय.
-
शालिनी तलवारने आपल्या याचिकेमध्ये हनी सिंगचे इतर महिलांसोबत शारीरिक संबंध असल्याचे आणि तो त्यांच्यासोबत सेक्स करायचा असे धक्कादायक आरोपही केलाय.
-
शालिनीकडून गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर हनी सिंगनेही इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट करत आपली बाजू मांडलीय.
-
“२० वर्षापासून शालिनी तलवार माझी पत्नी आहे. त्याच शालिनीने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर लावलेले सगळे आरोप हे खोटे आहेत. हे सगळे आरोप ऐकून मला दु:ख झालं आहे. भूतकाळात माझ्या गाण्यांवर आणि माझ्या आरोग्याविषयी अनेक नकारात्मक गोष्टींवरून टीका करण्यात आल्या, तरी मी कधीही प्रेस नोट किंवा कोणतीही पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, यावेळी शांत राहून काही होणार नाही असं मला वाटलं, कारण माझ्या वाईट परिस्थितीत मला साथ देणाऱ्या माझ्या वृद्ध पालकांवर आणि धाकट्या बहिणीवर आरोप केले आहेत. हे सगळे आरोप आम्हाला बदनाम करण्यासाठी केले जात आहेत,” असे हनी सिंग म्हणाला आहे.
-
“मी गेल्या १५ वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहे आणि देशभरातील कलाकार आणि संगीतकारांसोबत काम केले आहे. माझ्या टीममध्ये गेल्या १० वर्षांपासून जे लोक आहेत, त्यांना माझ्या आणि माझ्या पत्नीचे संबंध कसे आहेत याबद्दल माहित आहे. ती प्रत्येक चित्रीकरणाला, कार्यक्रमाला आणि मीटिंगमध्ये सोबत असते," असा उल्लेख हनी सिंगने केलाय.
-
"शालिनीने केलेल्या सगळ्या आरोपांचे मी खंडन करतो पण मी यावर काही बोलणार नाही कारण हे प्रकरण न्यायालयात आहे. या देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की सत्य लवकरच समोर येईल,” असं हनी सिंग म्हणाला आहे.
-
या सर्व प्रकरणामुळे हनी सिंग सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. प्रसारमाध्यमांमध्येगही हा विषय चांगलाच चर्चेत आहे.
-
हनी आणि शालिनीने एकमेकांवर केलेल्या या आरोपांनंतर या वादावर सामंजस्याने काही तोडगा निघतोय की कायदेशीर लढाईनंतरच या दोघांच्या नात्याचा निकाल लागणार हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच.

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच