-
सुपरस्टार अंकुश चौधरी तब्बल १५ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर दमदार एण्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे. स्टार प्रवाहवर २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या 'मी होणार सुपरस्टार' या डान्स रिअलिटी शोमध्ये अंकुश सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातलं टॅलेण्ट या डान्सच्या मंचावर अवतरणार आहे. त्यामुळे सुपरस्टार होण्याचं कुणाचं स्वप्न पूर्ण होणार याची उत्सुकता नक्कीच असेल. या स्पर्धकांमधून सुपरस्टार निवडण्याची जबाबदारी अंकुशच्या खांद्यावर आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
एक नवीन गूढ रहस्यमय मालिका १६ ऑगस्ट पासून रात्री १०.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, मालिकेचं नाव आहे 'ती परत आलीये'. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत. प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं कि विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये हत्या होते त्यामुळे सावध राहा अशी चेतावनी देताना दिसत आहेत. नक्की ही भानगड काय आहे? या मालिकेत अजून कोण कलाकार असणार आहेत? ही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.
-
हिंदी टेलिव्हिजनमधून आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. प्रार्थना चक्क ११ वर्षांनी झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या आगामी मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांतून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ पाडणारी प्रार्थना आता मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यामुळे प्रेक्षक चाहत्यांची उत्सुकता शिगेला गेली आहे.
-
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. श्रेयसने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. छोट्या पडद्यावरुन आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या श्रेयसने बॉलिवूडच्या रुपेरी पड्यावरदेखील मोठं यश मिळवलं. मात्र आता एका मोठ्या ब्रेकनंतर श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. झी मराठीवर लवकरच सुरु होणाऱ्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून श्रेयस तळपदे प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
-
झी मराठीवर नवी मालिका 'मन उडु उडु झालं' ३० ऑगस्टपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ऋताने या मालिकेचा टिझर आणि प्रोमो शेअर करत चाहत्यानांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना 'कमिंग बॅक होम वाली फिलिंग' असं म्हंटल. पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मालिका करताना ऋताचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
-
स्टार प्रवाह वाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांची आणि त्यांच्या साथीदारांची शौर्यगाथा पाहायला मिळत आहे. नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे,हंबीरराव मोहिते, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांची नावं आपल्याला परिचित आहेत. 'जय भवानी जय शिवाजी' ही मालिका या लवढय्यांच्या शौर्याला अर्पण असेल. अभिनेता भुषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवरायांची भूमिका साकारत आहे.
-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'सांग तू आहेस का?' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. 'सांग तू आहेस का?' मालिकेत स्वराजच्या भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आहे.
-
सोनी मराठी वाहिनीवर 'अजून ही बरसात आहे' ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेत अभिनेत्री मुक्ता बर्वे 'मिरा'ची भूमिका साकारत आहे. 'मुंबई-पुणे-मुंबई', 'डबल सीट', 'जोगवा' या आणि अशा अनेक दर्जेदार चित्रपटांद्वारे, सहजसुंदर अभिनयामुळे मुक्ता बर्वे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचली.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेतून अनेक लोकप्रिय कलाकार आपल्या दमदार अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यातच लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. या मालिकेत अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे साकारणार आहेत. हे ऐतिहासिक पात्र साकारण्यासाठी ते खुपच उत्सुक आहेत.
-
सोनी मराठी प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिकांची मेजवानी सातत्यानी घेऊन येत असते आणि त्यात आता 'अजूनही बरसात आहे' या नव्या मालिकेची भर पडली आहे. अभिनेता उमेश कामत 'आदिराज'ची भूमिका साकारत आहे. उमेश कामत हा तर तरुणींच्या गळ्यातला ताईतच. त्यानीही 'टाईम प्लिज', 'लग्न पाहावे करून' अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
-
'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत जिजाऊंची भूमिका कोण साकारणार याची कमालीची उत्सुकता होती. छत्रपती शिवरायांना स्वराज्याचं बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड. निशिगंधा वाड या इतिहासाच्या अभ्यासक आहेत. त्यामुळे जिजाऊ साकारणं हा अत्यंत सुखद अनुभव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. "अशी पालनकृत, ताठ कण्याची, कर्तबगार, कर्तृत्ववान जिजाऊ साकारणं हे भाग्याचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. इतकी कणखर भूमिका साकारायला मिळणं हा दैवी योग आहे." असं निशिगंधा वाड म्हणाल्या.
-
मराठी नाटक, सिनेमा एवढचं नाही तर हिंदी सिनेमातही अभिनेते संजय नार्वेकर यांनी प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. 'अगं बाई अरेच्या' मधील त्यांची धमाल असो किंवा 'वास्तव' मधील देडफुट्या प्रेक्षकांनी संजय यांच्या प्रत्येक भूमिकेला भरभरून प्रेम दिलंय. मात्र बऱ्याच काळानंतर आता हे लोकप्रिय अभिनेते मालिकाविश्तातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवरील 'तुझ्या इश्काचा नादखुळा' मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. लवकरच या मालिकेत संजय नार्वेकर यांची एण्ट्री होणार आहे. इन्सपेक्टर गौतम साळवी ही दमदार भूमिका ते साकारणार आहे.
-
'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून 'कोण होणार करोडपती'ला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक पाठबळ देत आहेत.
-
अभिनेता भरत जाधव – कलर्स मराठी वाहिनीवरील केदार शिंदे (स्वामी क्रिएशन्स) निर्मित आणि दिग्दर्शित 'सुखी माणसाचा सदरा' मालिका. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य कुटुंबातील कथा या मालिकेत उत्तमरित्या सादर करण्यात आली होती. त्यामुळे कमी कालावधीत ही मालिका प्रेक्षकांना भावली. आपण नेहेमीच ऐकतो सुखी माणसाचा सदरा हा प्रत्येकालाच हवा असतो. हा सदरा मिळणं काही कठीण नाही. प्रत्येकाकडे जीवन जगताना साधेपणाचा आणि समाधानाचा धागा असतो. तो फक्त विणत गेला की सुखाचा सदरा आपोआप तयार होतो.
-
ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी – सोनी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिका. या मालिकेद्वारे महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय. स्वराज्याचा राजा घडवण्यासाठी जिजाऊ शिवबांना न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचे धडे देताहेत. आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन शिवबांनी तोरणा गड स्वराज्यात आणला आहे आणि स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली आहे. स्वराज्याचा राजा, रयतेचा जाणता राजा घडवणाऱ्या मातेची कथा या मालिकेत दिसते आहे.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…