-
झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. आता या मालिकेच्या जागी एक नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘देवमाणूस’ या मालिकेच्या जागी १६ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या मालिकेचं नाव आहे, ‘ती परत आलीये’. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण मालिकेतील ‘ती’ म्हणजे नक्की कोण? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे.
-
नुकताच मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोममध्ये एक चित्तथरारक चेहरा आणि अंगावर भीतीने काटा आणणारं बॅकग्राउंड म्यूझिक असा एकंदरित प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
-
मात्र या प्रोमोमध्ये तिला पाहून भीती वाटत असली तरी प्रत्यक्ष आयुष्यात या तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री फारच सुंदर आहे.
-
'एक निर्णय' या मालिकेमधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे.
-
तसा हा चेहरा मराठी टीव्ही मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या ओळखीचा आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
-
सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
-
महाराष्ट्रातील घराघरांमध्ये हा चेहरा ओळखीचा आहे असंही म्हणता येईल.
-
इन्स्टाग्रामवर तिचे २४ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत
-
ती सोशल मीडियावर सक्रीय असून नेहमीच सोशल मीडियावरून आपल्या कामाची माहिती, फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
काही दिवसांपूर्वी तिच्या पोस्टवरुन येणाऱ्या ‘ती परत येतीय’ मालिकेची प्रमुख अभिनेत्री आहे, असा अंदाज बांधला जात आहे.
-
या मालिकेमध्ये मुख्य पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे कुंजिका काळवीट.
-
कुंजिकाने इन्स्टाग्रामवर यासंदर्भातील एक बातमी शेअर करत अप्रत्यक्षपणे यावर शिक्कामोर्तबच केलं आहे.
-
कुंजिकाचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या 'एक निर्णय' या पहिल्याच चित्रपटामध्ये तिने अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
त्यानंतर कुंजिका स्वामिनी मालिकेमध्येही दिसली होती. -
स्वामिनी मालिकेमध्ये कुंजिकाने आनंदीबाईची भूमिका साकारली होती.
-
या मालिकेमधून कुंजिकाने घराघरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि हा चेहरा महाराष्ट्रभर पोहचला.
-
‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेमध्ये देखील कुंजिकाने काम केले आहे.
-
कुंजिकाने श्रावण क्वीन ही स्पर्धाही जिंकली आहे.
-
सुभोद भावे हा कुंजिकाचा सर्वात आवडता अभिनेता आहे.
-
तर आवडत्या अभिनेत्रींमध्ये कुंजिकाची फर्स्ट चॉइस आहे, दीपिका पदुकोण.
-
कुंजिकाला आवडता पदार्श कुठला असं विचारल्यास ती गुळाची पोळी असं उत्तर देते.
-
नाचणे आणि अभिनय करणे हा आपला छंद असल्याच कुंजिका सांगते.
-
काळा आणि निळा हे कुंजिकाचे आवडते रंग आहेत.
-
आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्या स्वीकारत पुढे जात रहावं, अशी कुंजिकाची फिलॉसॉफी आहे.
-
प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही अनुभव देत असतेत. त्यामधून शिकत पुढे वाटचाल करावी असं कुंजिकाने लाइफ फंडाबद्दल बोलताना सांगितलेलं.
-
त्यामुळे आता कुंजिका या मालिकेमध्ये कोणत्या लूकमध्ये पहायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता लागलीय.
-
कुंजिका अनेक जाहिरातींमध्येही झळकली आहे.
-
या भूमिकेबद्दल कुंजिका फारच एक्सायटेड आहे असं सांगते.
-
कुंजिका सोशल नेटवर्किंगवर प्रचंड सक्रीय असून ती अनेक फोटो शेअर करत असते.
-
कधी सायकल चालवताना…
-
तर कधी आपले क्लोजअप फोटो कुंजिका इन्टाग्रामवरुन शेअर करत असते.
-
ढोल वाजवण्यापासून ते शोभा यात्रांमध्ये जाण्यापर्यंत टीपीकल मराठमोळ्या मुलीप्रमाणे अगदी खास लुकमध्ये कुंजिकाने पोस्ट केलेले फोटो चांगलेच चर्चेत होते.
-
यापूर्वीही आपण खलनायकी भूमिका साकारल्या आहेत त्यामुळे आपल्याला केवळ नकारात्मक भूमिकांसाठी विचारणा केली जात होती, असं कुंजिका सांगते.
-
कुंजिकाला स्वत:ला सस्पेन्स जॉनर प्रचंड आवडत असल्याने ‘ती परत आलीये'ची तिला फार उत्सुकता आहे.
-
'भेट लागी जीवा' आणि 'जिगरबाज' या मालिकेत काम करणारा अभिनेता श्रेयस राजेही या मालिकेत दिसणार असल्याचं समजतं.
-
श्रेयसही या मालिकेत मुख्य भूमिका असणार आहे, असं बोललं जात आहे. (सर्व फोटो इन्टाग्राम आणि फेसबुकवरुन साभार)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड