-
१५ ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिवस. हा दिवस साजरा करण्यासाठी याही वर्षी अनेकांनी खास तयारी केलीय. सगळ्यात विशेष बाब म्हणजे यावर्षीचा स्वातंत्र्यदिन हा रविवारच्या दिवशी येतोय. याचाच अर्थ असा की यंदाचा विकेंड हा लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूपच मजेदार असणार आहे.
-
सर्वांचा हॉलिडे मोड खूप आधीच सुरू होणार आहे. अशात बुधवारपासूनच एका पेक्षा एक चित्रपट आणि वेब सीरिजची मांदियाळी मांडण्यात आलीय. हे चित्रपट पाहून तुम्ही स्वातंत्र्यदिन साजरा करू शकता.
-
द किसिंग बूथ 3 : प्रेम आणि मैत्रीच्या संघर्षाची कहाणी असलेल्या 'द किसिंग बूथ' फ्रेंचायजीचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यात एली इवांस (जॉय किंग), नोआ फ्लिन (जॅकब ऐलोरडी) आणि ली फ्लिन (जोएल कोर्टनी) की तरूण मंडळी पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झालीय. ११ ऑगस्ट रोजीच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय.
-
कुरुथी : या मल्ल्याळम चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन आणि रोशन मैथ्यूज हे मुख्य भूमिकेत आहेत. डार्क थ्रीलर असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना रोलर कोल्टर राइ़डचा अनुभव देतो.
-
'कुरुथी' या चित्रपटात मल्ल्याळम चित्रसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहरे झळकताना दिसून येत आहेत. कुरुथी हा चित्रपट सुद्धा बुधवारीच अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झालाय.
-
बेकेट : जॉन डेविड वाशिंगटन स्टारर हा चित्रपट एक राजकीय थ्रीलर चित्रपट आहे. या चित्रपटात एका अमेरिकन व्यक्तीची कहाणी दाखवण्यात आलीय.
-
एका विनाशकारी दुर्घटनेच्या नंतर ग्रीक अधिकाऱ्यांचं टार्गेट बनणाऱ्या या व्यक्तीची कहाणी 'बेकेट' मध्ये दाखवण्यात आली असून फारच रोमांचक आहे.
-
ज्यांना ट्विस्ट अॅण्ड टर्नने भरलेले चित्रपट आवडतात अशा प्रेक्षकांसाठी 'बेकेट' चित्रपट म्हणजे ट्रीटच ठरेल. येत्या १३ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झालाय.
-
शेरशाह : ज्या प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाचं चित्र पुन्हा एकदा अनुभवायचं असेल अशा प्रेक्षकांनी 'शेरशाह' हा चित्रपट पहायलाच हवा. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'शेरशाह' या चित्रपटासठी प्रेक्षक बऱ्याच दिवसापासून प्रतिक्षा करत होते.
-
अखेर त्यांची ही प्रतिक्षा संपली असून आज हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झालाय. कारगिल शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन विष्णूवर्धन यांनी केलंय.
-
या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी देखील झळकतेय.
-
भुज: द प्राइड ऑफ इंडिया- स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशभक्ती रंगात मिसळणारा आणखी एक चित्रपट 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' भेटीला येतोय. अजय देवगण या चित्रपटात स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारत आहे.
-
हा चित्रपट 1971 साली पाकिस्तानने भारताच्या एअरबेसवर केलेल्या हल्ल्यावर आधारित हा चित्रपट आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी १३ ऑगस्ट रोजीच रिलीज झाला आहे. आपण हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर पाहू शकता.
-
मॉर्डन लव सीजन 2 : ही एकूण आठ भागांची एंथोलॉजी सिरीज असून याच नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध न्यूयॉर्क टाइम्स कॉलमने प्रेरित आहे. रोमॅण्टिक कॉमेडी एंथोलॉजी शोच्या पहिल्या सीझनमध्ये प्रेमाचा शोध घेणारी कहाणी दाखवण्यात आलीय.
-
'मॉर्डन लव सीजन 2' मध्ये यौन, रोमान्स, कुटूंब, प्लॅटोनिक आणि आत्म-प्रेम या भावनांचं दर्शन घडवणार आहे. यंदाच्या सीजनमध्ये एकूण आठ कहाण्या दाखण्यात येणार आहेत.
-
'मॉर्डन लव सीजन 2' मध्ये ऐनी हॅथवे, देव पटेल, टीना फे, किट हॅरिंगटन आणि अन्ना पक्विन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही सीरिज १३ ऑगस्ट रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.
-
ब्रूकलिन नाइन-नाइन : सुप्रसिद्ध 'ब्रूकलिन नाइन-नाइन'च्या आगामी सीझनमधून एन्डी सॅमबर्ग, आंद्रे ब्रूगर, स्टेफनी बीट्रिज प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. नुकतंच नेटफ्लिक्सवर ही सीरिज रिलीज झालीय.
-
या नव्या सीझनमध्ये आपल्या मुलांसोबत काम करणारा जासूस आई-वडिलांसोबत डील करतो का ? जॅक आणि एमीला मूल होण्यास कशी मदत होईल? होल्ट कमिश्नर बनू शकतील का? आणि रोझा आणि तिच्या जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरं या सीझनमध्ये मिळणार आहेत.
-
या सर्व चित्रपटांतून आपल्याला भारत देशाच्या गौरवकथा पाहून नक्कीच तुम्हाला आपल्या देशाचा अभिमान वाटेल हे मात्र नक्की.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख