-
बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा बऱ्याच मोठ्या गॅपनंतर पती निक जोनासला भेटलीय. त्यामूळे हे कपल आता लंडनमध्ये एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसून येत आहेत.
-
नुकतंच या दोघांना लंडनमध्ये एका प्रसिद्ध रेस्तरॉंमधून बाहेर पडताना त्यांना स्पॉट करण्यात आलं. यावेळी या क्यूट कपने त्यांच्या फॅन्ससोबत काही फोटोज देखील क्लिक केले.
-
या क्यूट कपलच्या रोमॅण्टिक डेटवरून बाहेर पडतानाचे दोघांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
यापूर्वी प्रियांका चोप्रा आणि पती निक जोनास हे दोघे कूल आऊटफिटमध्ये भर पावसात लंडन शहरातील रस्त्यावर हातात हात घालून फिरताना दिसून आले.
-
बऱ्याच दिवसांनत पति निकला भेटल्यानंतर अभिनेत्री प्रियांचा चोप्रा सध्या बरीच रोमॅण्टिक झाली. नुकतेच हे दोघे लंडनमधल्या नाइट्सब्रिज रेस्तरॉंमध्ये रोमॅण्टिक डेटवर गेले होते.
-
रोमॅण्टिक डेटवर गेलेल्या क्यूट कपलचा लूक देखील पाहण्यासारखाच होता. यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्राने जेब्रा प्रिंट ड्रेस परिधान केला होता. तर निक जोनास कलरफुल शर्ट आणि ब्लॅक पॅन्टमध्ये हॅंडसम दिसून येत होता.
-
प्रियांका चोप्रा सध्या लंडनमध्ये तिच्या आगामी 'सिटाडेल' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिला भेटण्यासाठी पती निक जोनास जेव्हा लंडनमध्ये पोहोचला, त्यावेळी प्रियांकाने 'वे घर आ गए हैं' अशी कॅप्शन देत एक सेल्फी शेअर केली होती.
-
प्रियांका आणि निक हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात या दोघांचेही फोटो आणि व्हिडीओज पाहणारा एक चाहता वर्ग आहे.
-
प्रियांका तिच्या शूटिंगमुळे लंडनमध्ये तर पती निक जोनास त्याच्या अमेरिकेतल्या घरी होता. मोठ्या गॅमनंतर हे दोघे भेटले आहेत.
-
त्यामूळे आता ते एकमेकांनासोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाहीत. अनेकदा त्यांना लंडनमध्ये कधी रेस्तरॉंमध्ये तर कधी शहरातील रस्त्यांवर फिरताना दिसून येत असतात. (PHOTO: instagram/nickyanka18)

“त्याने मला ओळखही दिली नाही”, कपिल शर्माच्या वागणूकीवर ज्येष्ठ अभिनेत्याची नाराजी; म्हणाले, “संपूर्ण देश माझ्या पाया…”