-
अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तिथली परिस्थिती भीषण झाली आहे. अफगाणिस्तानमधून समोर येणारी दृश्य ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. खास करून महिलांची स्थिती ही खूपच चिंताजनक आहे. महिलांवर पुन्हा एकदा बुरखाच्या आत घरात दडून बसण्याची वेळ आलीय. कट्टर इस्लामचं पालन करणाऱ्या अफगाणिस्तामध्ये महिलांवर अनेक बंधन असतानादेखील एकेकाळी मॉडेल विदा समदझाईने बिकिनी पिरधान करून रॅम्प वॉक करण्याचं धाडसं केलं होतं.
-
विदा समदझाईने बिकिनी परिधान केल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये एकच खळबळ माजली होती.
-
विदा समदझाईनेचा जन्म १९७८ सालामध्ये काबूलमध्ये झाला होता. विदा समदझाईने फॅशन क्षेत्रात आपलं करिअर करण्याचा निर्णय घेतला.
-
२००३ सालामध्ये विदा समदझाईने मिस अफगाणिस्तानचा मुकुट जिंकला आहे. त्यानंतर तिने मिस अर्थ या स्पर्धेतही सहभाग घेतला.
-
या स्पर्धेत विदा समदझाईने लाल रंगाची बिकिनी परिधान करून रॅम्प वॉक केलं. विदाने बिकिनी परिधान केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
-
विदा समदझाईने बिकिनी परिधान केल्याने अफगाणिस्तानमधील अनेकांनी संताप व्यक्त केला होता.
-
एवढचं नव्हे तर अफगाणिस्तानमधील सुप्रिम कोर्टाने देखील विदा समदझाईने बिकिनी परिधान केल्याने आक्षेप घेत टीका केली होती.
-
बिकिनी परिधान करून अंगप्रदर्शन करणं हे इस्लाम धर्माविरोधी असून अफगाण परंपरेच्या विरुद्ध असल्याचं म्हणत सुप्रिम कोर्टाने विदाला फटकारलं होतं.
-
त्यानंतर विदाला मिस अर्थ स्पर्धेत 'ब्यूटी फॉर द कॉज' सन्मान देण्यात आला.
-
१९९६ सालामध्ये विदा अमेरिकेमध्ये स्थायिक झाली. कॅलिफोर्नियामधून तिने पुढील शिक्षण पूर्ण केलं.
-
काही वर्षांनी विदाने अमेरिकेचं नागरिकत्व मिळवलं.
-
अमेरिकेत राहत असतानाच विदाने अफगाणिस्तानमधील महिलांसाच्या शिक्षणासाठी आणि अधिकारांसाठी एक संस्था स्थापन केली होती.
-
अफगाणिस्तानमध्ये वाढलेल्या विदाने तिथली परिस्थिती अनुभवली होती. काही मुलाखतींमध्ये तिने तिथल्या परिस्थितीचा खुलासा केला होता.
-
2003 सालामध्ये विदाने दिलेल्या मुलाखतीत त्यावेळेच्या अफगाणिस्तानमधील परिस्थितीचं वर्णन केलं होतं. विदा मुलाखतीत म्हणाली होती, "अफगाणी महिला असल्याने मी सांगू इच्छिते की आम्ही देखील प्रतिभावान, समजूतदार आणि सुंदर असतो."
-
त्यावेळी तिथं तालिबानचं वर्चस्व संपुष्टात आलं होतं. विदा म्हणाली, "आता महिला शाळेत किंवा कामाला जाऊ शकतील. आता त्यांना बुरखा घालण्याचं बंधन नाही. त्या स्वतंत्र आहेत." असं ती म्हणाली होती.
-
2005 सालामध्ये विदाने मिस अमेरिकेचा किताबही पटकावला आहे.
-
विदाने चर्चेत असलेल्या 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वातही भाग घेतला होता.
-
या शोमध्ये विदा आणि अभिनेता अमर उपाध्यायमध्ये चांगली बॉण्डिंग पाहायला मिळाली होती.
-
अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवर विदाने दु:ख व्यक्त केलं
-
"माझ्या डोळ्यात आता अश्रूदेखील उरले नाहीत" असा मजकूर असलेल्या एका पेपरचं कटिंग तिने सोशल मीडियावर शेअर केलं होतं. (All Photo-Instagram/facebook-Vida Samadzai)
Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा