-
मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधून हे नातं आणखी घट्ट करतात. भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन बहिणीला देतो. हा दिवस सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींसाठीदेखील खास असतो. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीचे भाऊ किंवा बहीण नेमके कसे असतील, हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल ना. आज रक्षाबंधनाच्या दिवशी जाणून घेऊयात हिंदी कलाविश्वातील यशस्वी सेलिब्रिटीच्या भावंडांबद्दल…(Photo-Loksatta File Images)
-
फरहान अख्तर-झोया अख्तर : ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय बहिण-भवाची जोडी आहे. जावेद अख्तर आणि हनी इराणीची ही मुलं. झोया आणि फरहानने एकत्र काम देखील केलं आहे. झोया 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'दिल धडकने दो' यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे ज्यात फरहान याने काम केलं आहे. फरहान अख्तरसुद्धा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटात साकारलेल्या मिल्खा सिंग यांच्या भूमिकेने प्रेक्षकांचं मन जिंकले आहे. (Photo-Loksatta File Images)
-
हुमा कुरेशी-साकिब सलीम : 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटातून लोकप्रियता प्राप्त झालेली अभिनेत्री म्हणजे हुमा. तिचा भाऊ साकिब सलीम देखील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनके वेब सीरिज आणि चित्रपटात देखील काम केलं आहे. हे दोघे बहीण-भाऊ हुमा मुंबईत एकत्र राहतात. त्या दोघांनी ‘दोबारा’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.(Photo-Loksatta File Images)
-
जान्हवी कपूर-अर्जुन कपूर : निर्माता बोनी कपूर आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा अर्जुन कपूर आणि दुसऱ्या पत्नीची मुलगी जान्हवी कपूर. यांच्यातील नातं अजून छान झालं आहे. हे जारी सावत्र बहीण-भाऊ असले तरी ते नेहमी एकमेकांची काळजी घेत असतात. अर्जुन कपूर हा सोनम कपूरचा देखील भाऊ आहे. अनेक वेळा ही भावंडे सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. (Photo-Loksatta File Images)
-
करीना कपूर-रणबीर कपूर : बहीण-भावांबद्दल बोलत असू आणि कपुर खानदानाचे नाव येणार नाही असं शक्यच नाही. या फॅमिलीमधील लोकप्रिय बहीण-भावाची जोडी म्हणजे करीना कपूर आणि रणबीर कपूर. या दोघांमधील बॉन्ड आपण 'कॉफी विथ करण' या शो मध्ये पहिला होता.(Photo-Loksatta File Images)
-
साजिद खान-फरहा खान : दिग्दर्शक साजिद खान हा कोरीओग्राफर, दिग्दर्शक आणि निर्माती फराह खानचा भाऊ आहे. साजिद खानने हाऊसफुल, हमशकल सारख्या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसंच फराह खानने देखील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. (Photo-Loksatta File Images)
-
सलमान खान-अर्पिता खान : सलमान एक खूप प्रोटेक्टिव्ह भाऊ आहे. तो अर्पिताला खूप जपतो. अर्पिता खानच्या लग्नाची बरीच चर्चा होती. कारण या लग्नातील सगळ्या गोष्टींची खास दाखल तिचा भाऊ सलमान खानने घेतली होती. अर्पिता खानला सलमान खानच्या वडिलांनी दत्तक घेतले आहे. सावत्र बहीण असली तरी त्यांच्यात खूप छान बॉन्ड आहे. (Photo-Loksatta File Images)
-
श्वेता बच्चन-अभिषेक बच्चन : ज्युनिअर बच्चन म्हणजे अभिषेक आणि श्वेता हे सख्खे भाऊ-बहीण आहेत. श्वेता चित्रपटसृष्टी पासून लांब आहे. मात्र तरीही नेहमीच चर्चेत असते. श्वेता बच्चन हिचे लग्न बिझनेसमन निखिल नंदाशी झाले आहे. श्वेता आणि अभिषेक दोघं ही एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. (Photo-Loksatta File Images)
-
सैफ आली खान-सोहा आली खान : बॉलिवूडमधील नवाब म्हणून ओळखले जाणाऱ्या बहीण भावाची जोडी म्हणजे सैफ अली खान आणि सोहा अली खान. सैफ अजून ही अनेक वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम करत आहे. मात्र सोहा लग्न झाल्यानंतर कोणत्याही चित्रपटात काम केलं नाही. (Photo-Indian Express)

“त्याने मला ओळखही दिली नाही”, कपिल शर्माच्या वागणूकीवर ज्येष्ठ अभिनेत्याची नाराजी; म्हणाले, “संपूर्ण देश माझ्या पाया…”