-
रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या नात्याला दृढ करणारा सण. या दिवशी बहीण तिच्या भावाला राखी बांधते. तर भाऊ तिचे रक्षण करण्याचे आश्वासन देतो. आपल्या छोट्या पडद्यावर देखील असे बहीण भावाचं नातं सांगणाऱ्या अनेक जोड्या आहेत. चला तर मग नजर टाकूयात लोकप्रिय ऑन स्क्रीन बहीण-भावांच्या जोडीवर. (Photo-Instagram/ Apurva Gokhale, Shalmali)
-
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत रेणुका आणि जयदीप या बहीण भावाच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.(Photo-Hotstar)
-
छोट्या पडद्यावरची अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे 'आई कुठे काय करते'. यात अरुंधतीच्या मुलांमध्ये खूप छान बॉन्ड बघायला मिळतो.(Photo-Instagram/ Apurva Gokhale)
-
यश,अभिषेक, इशा यांच्यातील बहीण-भावाचे नाते प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे. यांचे हे नातं फक्त ऑनस्क्रीन नाही ऑफ स्क्रीनसुद्धा खूप छान आहे. अभिषेक देशमुख निरंजन कुलकर्णी सतत एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. (Photo-Instagram/ Apurva Gokhale)
-
रंग माझा वेगळा' या मालिकेमध्ये अशुतोष गोखले कार्तिकची तर शाल्मली लावण्याची भूमिका साकारताना दिसत आहेत. (Photo-Instagram/Shalmali)
-
'फुलाला सुगंध मातीचा' ही देखील लोकप्रिय मालिका आहे. यात सागर आणि किर्ती ही बहीण भावाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. नुकताच या मालिकेत चक्क भावाने बहीणीला राखी बांधून हा सण वेगळ्या प्रकारे साजरा केला आहे.(Photo-Instagram)
-
'राजा राणीची ग जोडी'मध्ये संजूला भाऊ नाही. मात्र तिचा दिर सुजितने संजूला राखी बांधून हा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. (Photo-Instagram)
-
'अजून ही बरसात आहे' सोनी वाहिनीवरील या लोकप्रिय मालिकेत मुक्त बर्वे आणि सचिन देशपांडे हे बहीण भावाच्या भूमिकेत दिसत आहेत. यांची या जोडीला खूप कमी वेळातचं प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळत आहे. (Photo-Youtube)

Sharad Pawar : शरद पवारांची प्रतिक्रिया; “नीलम गोऱ्हेंनी केलेलं वक्तव्य मूर्खपणाचं, यापेक्षा…”