नररेच्या एका कटाक्षाने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झाली. -
अगदी काही सेकंदाच्या डोळा मारतानाच्या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकुळ घालणारी प्रिया आज सोशल मीडियाची क्वीन आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
-
सोशल मीडिया सेन्सेशन असणाऱ्या प्रिया प्रकाश वारियरचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
-
सोशल मीडियावर प्रिया चांगलीच सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
-
यामुळेच अनेक ब्रॅण्ड सध्या प्रियासोबत सोशल मीडियावरुन जाहिरात करण्यासाठी उत्सुक असतात आणि मागील काही काळापासून प्रिया आपल्या इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या ब्रॅण्डसंदर्भातील फोटो पोस्ट करत असते.
-
ओणम हा केरळमधील अत्यंत प्रसिद्ध सण आहे. ओणमचा हा सण एकूण १० दिवसांचा असतो. फक्त केरळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याच सणानिमित्त प्रियाने हे फोटो आणि एक खास व्हिडीओ शेअर केलाय.
-
ओणम निमित्त तिने केलेल्या एका शूटमध्ये सफेद रंगातील साडीमधील फोटों पोस्ट केलेत. हे एका वेबसाईटचं प्रमोशन आहे.
-
पारंपरिक दाक्षिणात्य पेहरावात प्रिया फारच सुंदर दिसत आहे.
-
प्रिया सोशल मीडियावर कायमच आपले वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते.
-
नुकतेच तिने ओणम निमित्त दोन ते तीन जाहिरातींसंदर्भातील पारंपरिक पण बोल्ड फोटो शेअर केलेत.
-
यापैकी एक जाहिरात कपड्यांच्या एका ब्रॅण्डची आहे.
-
प्रियाच्या या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा असली तरी तिने यापूर्वीचे ओमण स्पेशल जाहिरातींमधील फोटोही फारच चर्चेत होते.
-
तसेच तिने काही पांढऱ्या रंगाच्या कंपड्यांमधील फोटोही शेअर केलेत.
-
काही फोटोंमध्ये प्रिया हातामध्ये गजरे पकडून उभी असल्याचं दिसतंय.
-
या फोटोंमध्ये प्रिया फारच सुंदर दिसत आहे.
-
काही फोटोंमध्ये प्रिया अगदी मादक नजरेने थेट कॅमेरात पाहताना दिसतेय.
-
प्रियाने पोस्ट केलेले हे फोटो आऊटडोअर आणि इंडोअर शूटचे आहेत.
-
नुकतेच प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही पारंपरिक कपड्यांमधील मात्र बोल्ड तसेच मादक अदांसहीत फोटो शेअर केले होते.
-
या फोटोंनी प्रियाच्या चाहत्यांना पुरतं घायाळं केलंय.
-
तिने एका फॅशन वेबसाईटसाठी केलेलं ओणम स्पेशल खास फोटो शूट सोशल नेटवर्किंगवर शेअर केलं आहे.
-
सोन्याचे दागिने आणि दाक्षिणात्य पद्धतीने छान नटून थटून प्रिया या फोटोंमध्ये दाक्षिणात्य परंपरेची झळक दाखवत आहे.
-
एका फोटोमध्ये ती फुलांची रांगोळी काढतानाही दिसत आहे.
-
इन्टाग्रामवर प्रियाचे ७० लाख ७२ हजार फॉलोअर्स आहेत.
-
एवढे फॉलोअर्स असल्यानेच प्रिया एक अभिनेत्री असण्यासोबतच सध्या महिलांसाठी सोशल इन्फ्यूएन्सर म्हणूनही फार लोकप्रिय आहे.
-
फॉलोअर्सच्या संख्येमुळेच अनेक कपड्यांचे, दागिण्यांचे ब्रॅण्ड प्रियासोबत सोशल नेटवर्किंगवरुन खास जाहिराती करताना दिसतात. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल