-
करोना काळात ओटीटीवर अशा अनेक वेब सीरिज आहेत ज्याच्या दुसऱ्या सिझनसाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसंच बॉलिवूडमधील अनेक कलाकार आहेत जे वेब सीरिजच्या जगात पदार्पण करणार आहेत. अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री माधुरी दीक्षित रवीना टंडन, जुही चावला. हे सगळे बॉलिवूड कलाकार लवकरच वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. जाणून घेऊयात या वेब सीरिज कोणत्या आहेत आणि कोणत्या वेब सीरिजचे नवीन सिझन येत आहेत. तसंच तुम्ही या वेब सीरिज कुठे पाहू शकता.(Photo-webseries)
-
बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या मुलीच्या जीवनावर आधारित 'मसाबा-मसाबा' या वेब सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी मसाबा गुप्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर घोषणा केली की या सीरिजचा नवीन सिझनचे शूटिंग सुरू झाले असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.(Photo-netflix)
-
एक कपल, त्यांच्या आयुष्यतील छोट्या-छोट्या गोष्टी कशा पद्धतीने हाताळतात त्याची कथा ध्रुव आणि मिथिला सांगताना दिसतात. 'लिटिल थिंग्ज' या सीरिजचा नवीन सिझन लवकरच नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.(Photo-Netflix)
-
अभिनेता अजय देवगण याची बहुचर्चित वेब सीरिज 'रुद्र' ही लवकरच हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या क्राइम थ्रील सीरिजमध्ये अजय देवगण सोबत इलियाना डिक्रूज देखील मुख्य भूमिका साकारताना दिसेल.(Photo-Hotstar)
-
ज्या वेब सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. त्या यादीत रोहित सराफ, प्राजक्ता कोळी, रणविजय सिंघ, विद्या मालवडे यांची अनोखी वेब सीरिज 'मिसमॅच्ड'. ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच टॉप ट्रेंडिंग वेब सीरिजच्या यादीत सामील झाली होती. काही दिवसांपूर्वी या सीरिजच्या दुसऱ्या सिझनचे शूटिंग सुरू झालं आल्याची माहिती नेटफ्लिक्सने एका व्हिडीओ शेअर करत दिली.(Photo-netflix)
-
अभिनेत्री जुही चावला, आयेशा झुलका या दोघांची जोडी 'हूश -हूश 'या वेब सीरिजमध्ये दिसतील. या अॅमेझॉन प्राईमवरच्या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री कृतिका कामरा, सोहा अली खान देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.(Photo-Amazon)
-
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित देखील अभिनेता संजय कपूरसोबत नेटफ्लिक्सच्या 'फाइंडिंग अनामिका' या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे.(Photo-netflix)
दिल्ली क्राइम – सत्य घटनेवर आधारित या सीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. नुकताच या सीरिजच्या निर्मात्यांनी दुसऱ्या सिझनची घोषणा केली आहे. या नवीन सिझनमध्ये शेफाली शाह, रसिका दुगल, राजेश तैलंग आणि आदिल हुसेन पुन्हा एकदा नवीन क्राइम स्टोरीवर काम करताना दिसतील. (Photo-netflix) -
असुर सिझन २- अर्शद वारसी, बरूण सोबती, अमेय वाघ आणि रिद्धी डोगरा यांची प्रमुख भूमिका असलेली ही वेब सीरिज. या सीरिजच्या पहिल्या सिझनला खूप रोमांचक वळणावर आणून सोडले आहे. त्यामळे आता याच्या दुसऱ्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.(Photo-Voot)
-
कोटा फॅक्टरी – टीव्हीएफची ही वेब सीरिज इंजिनेरिंग आणि एकंदरीत विद्यार्थ्यांवर येणाऱ्या समस्या सांगणारी आहे. यात जितेंद्र कुमार, मयुर मोरे,एहसास चन्ना आणि रेवती पिल्लई प्रमुख भूमिका साकारत आहेत आणि याचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे.(Photo-YouTube)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का