-
अभिनेते अनिल कपूर यांची धाकटी मुलगी आणि सोनमची बहीण रिया नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे.
-
रियाने बॉयफ्रेंड करण बूलाणीसोबत लग्न गाठ बांधली आहे.
-
१४ ऑगस्टला रिया आणि करणचा अनिल कपूर यांच्या जुहू येथील बंगल्यात विवाह सोहळा पार पडला.
-
संगीत आणि मेहंदी सारखे कोणतेही पारंपरिक कार्यक्रम न करता अगदी साध्या पद्धतीने रिया आणि करण लग्न बंधनात अडकले.
-
या विवाहसोहळ्यात रियाने परिधान केलेल्या कपड्यांची आणि लूकची देखील चांगलीच चर्चा रंगली होती.
-
रियाने टिपीकल लाल लेहंगा परिधान न करता पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.
-
त्यानंतर नुकतेच रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मैत्रिणीं आयोजित केलेल्या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील रियाचा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
-
या पार्टीसाठी खास सजावट करण्यात आली होती.
-
रियाने पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. यात तिने पांढऱ्या रंगाचा ऑर्गन्झा स्कर्ट परिधान केलाय. या स्कर्टवर विविध भाषेत लव्ह म्हणजे प्रेम हा शब्द लिहिलेला आहे.
-
या स्कर्टवर रियाने लाल रंगाचं बॉम्बर जॅकेट परिधान केलंय. तसचं पायात पांढऱ्या रंगाचे शूज धातले आहेत.
-
या फोटोत रियाने केस मोकळे सोडले असून तिच्या कपाळावर लाल कुंकवाचा टिळा दिसतोय.
-
तसचं तिने पायाला अल्ता देखील लावलाय.
-
या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, "ही पहा राधे माँ, तू इतरांना दिवसेंदिवस सुंदर बनवत असताना स्वत: मात्र मूर्ख दिसू लागली आहेस"
-
तर आणखी एक युजर म्हणाला, "तू सुंदर दिसतेयस पण शक्य असेल तर जरा केस बांधत जा" (All Photo-Instagram@rheakapoor)
-
रियाने तिच्या लग्नानंतर विविध लूक मधील फोटो शेअर केले असून तिचा प्रत्येक लूक नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख