-
‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही नवी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलीय.
-
या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
-
श्रेयस आणि प्रार्थना या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा ही चमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे.
-
या तिघांव्यतिरिक्त अभिनेता संकर्षण कऱ्हाडेही या मालिकेमध्ये मुख्य भूमिकांपैकी एका भूमिकेत दिसत आहे.
-
सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असली तरी या मालिकेतील प्रत्येक कलाकारासाठी कोणत्या ना कोणत्या कारणाने खास आहे. मात्र त्याचबरोबर या मालिकेसाठी प्रत्येक कलाकाराने आकारलेल्या मानधनाचा आकडाही मालिकेइतकाच खास आहे.
-
विशेष म्हणजे मानधनाच्या बाबतीत वयाने छोटी असणारी मायरा कमाईच्या बाबतीत इतर कलाकारांना तोडीस तोड आहे असं म्हणता येण्याइतकं तिचं मानधन आहे. जाणून घेऊयात या मालिकेमध्ये काम करणारे कलाकार आणि त्यांच्या मानधनाच्या आकड्यासंदर्भात.
-
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे या मालिकेत सेकेण्ड लीड साकारत आहे.
-
संकर्षणणे जागतिक वडापाव दिनानिमित्त पोस्ट केलेला हा फोटो मालिकेच्या सेटवरीलच आहे.
-
मालिकेच्या एका भागासाठी संकर्षण २८ हजारांचं मानधन घेतो.
-
या मालिकेत श्रेयस तळपदेबरोबरच अभिनेत्री प्रार्थना बेहरेसोबत झळकली आहे.
-
प्रार्थनादेखील बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
-
"श्रेयससारख्या मोठ्या कलाकारासोबत काम करण्याचे माझे स्वप्न होते. त्यांच्यासोबत चित्रपटात भूमिका मिळावी अशी माझी फार आधीपासूनच इच्छा होती," असं या मालिकेबद्दल बोलताना प्रार्थना सांगते.
-
"मालिकेत सहकलाकार आणि त्यातही प्रेमासारख्या संवेदनशील विषयावर ही मालिका असल्याने चित्रपट मिळाला नसला तरी श्रेयससोबत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण झालीय", असे प्रार्थना सांगते.
-
"मला गेली अनेक वर्ष खूप मालिकांच्या ऑफर आल्या. परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचे ठरवले होते," असं ही मालिका निवडण्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाबद्दल बोलताना प्रार्थना म्हणते.
-
"आपले चाहते आपल्याला पाहायला उत्सुक असतात. म्हणूनच मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्याचा निर्णय घेतला आणि ही मालिका स्वीकारली," असं प्रार्थनाने सांगितलं.
-
अनेक वर्षांनी प्रार्थनाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं असलं तरी तिचं मानधन हे मोठ्या पडद्यावरील अभिनेत्री असल्याने अधिक आहे.
-
प्रार्थना बेहरे या मालिकेच्या एका भागासाठी ३२ हजार रुपये घेते.
-
‘आभाळमाया’, ‘दामिनी’ ‘अवांतिका’ मराठी यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून श्रेयसने सुरुवातीच्या काळातच आपली ओळख निर्माण केली होती.
-
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. श्रेयसने आजवर विविध भूमिका साकारात प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. छोट्या पद्यावरुन आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या श्रेयसने बॉलिवूडच्या रुपेरी पड्यावरदेखील मोठं यश मिळवलं. मात्र आता एका मोठ्या ब्रेकनंतर श्रेयसनं ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे.
-
त्यानंतर हिंदी मालिकांसोबतच तो ‘सावरखेड’, ‘आईशप्पथ’ या मराठी सिनेमांमधून झळकला. २००५ सालामध्ये आलेल्या ‘इक्बाल’ सिनेमातून श्रेयसने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
आता तो झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
-
‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या एका भागासाठी श्रेयस तळपदे ३८ हजार रुपये मानधन घेतो.
-
श्रेयस आणि प्रार्थना या दोन उत्तम कलाकारांसोबतच चमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे.
-
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील चमुकलीचं नाव मायरा वायकुळ असं आहे.
-
मायराच्या मानधनाबद्दल बोलूयाच पण त्याआधी आपण थोडं तिच्याबद्दल जाणून घेऊयात.
-
मायरा अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडियावर सुपर अॅक्टिव्ह आहे.
-
मायरा चार वर्षांची आहे.
-
मायरा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.
-
मायरा सोशल मीडिया स्टार आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
-
टिकटॉकमुळे अनेकांना प्रसिद्ध होण्याची संधी मिळाली. टिकटॉक या अॅपवर मायराचे खूप फॉलोअर्स होते.
-
इन्स्टाग्रामवर मायराचे ९० हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.
-
मायराचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिची आई श्वेता वायकुळ सांभाळते.
-
तिच्या फोटोंना हजारोंच्या संख्येने लाइक्स असतात.
-
मायराची आई श्वेताचेही इन्स्टाग्रामवर ३५ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.
-
मायराच्या बाबाचं नाव गौरव वायकुळ असं आहे.
-
मायराचे 'Myra's Corner' हे युट्यूब चॅनेलदेखील आहे.
-
या युट्यूब चॅनेलवर मायराचे अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील.
-
इन्स्टाग्राम रिल्समुळेही मायरा फार लोकप्रिय झालीय.
-
मायरा मुंबईत आपल्या कुटुंबासोबत राहते.
-
मायराला साडी नेसण्याची विशेष आवड असल्याचं दिसून येतं.
-
'तू एक परी' या आगामी मराठी चित्रपटात मायरा झळकणार आहे.
-
सध्या या चित्रपटाविषयी फारसा खुलासा करण्याकत आला नाही.
-
आता मायराच्या मानधनासंदर्भात बोलायचं झाल्यास अवघ्या चार वर्षांची ही चिमुकली एका भागासाठी तब्बल १० हजार रुपये मानधन घेते.
-
इतर कालाकारांच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी वयाच्या मनाने मायराची कमाई छोटा पॅकेट बडा धमाका अशीच म्हणावी लागेल.
-
मराठी सितारा या युट्यूब चॅनेलने या सर्व समानधनासंदर्भातील माहिती दिलीय. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

पिंपरी-चिंचवड अन् भोवतालच्या पाच किलोमीटर परिसरातील शेकडो गृहप्रकल्प अडचणीत