-
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिद्धार्थ शुक्ला ४० वर्षांचा होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे (photo indian express)
-
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला आज मुंबईतील कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याचे निधन झाले. (photo indian express)
-
छोट्या पडद्यावरील मोठा कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. सिद्धार्थचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. कमी वेळेत त्याने अनेक चाहत्यांचे मनं जिंकली होती. (photo indian express)
-
सिद्धार्थच्या जाण्याने अभिनेता सलमान खान सुद्धा भावूक झाला आहे. (photo indian express)
-
सिद्धार्थ शुक्लाला टीव्ही सीरियल बालिका वौधमधून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. तो दिल से दिल तक या मालिकेतही दिसला. त्याने हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (photo indian express)
-
बिग बॉस १३ मधून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलसोबत त्यांच्या जोडीला चांगलीच पसंत मिळाली होती. दोघेही अलीकडेच बिग बॉस OTT मध्ये दिसले होते. (photo indian express)
-
याशिवाय सिद्धार्थ शुक्लाने फियर फॅक्टर-खतरों के खिलाडी सीझन ७ मध्ये दिसला होता. त्यांनी सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट होस्ट केले होते. त्याची ब्रोकन हार्ट बट ब्यूटीफुल ही वेब सिरिज चांगलीच चर्चेत होती. (photo indian express)
-
बिग बॉस सीझन १३ मध्ये सिद्धार्थ शुक्लाला सलमान खानने अनेक वेळा फटकारले होते. सलमानने सिद्धार्थच्या स्वभावामुळे येणाऱ्या समस्यांबाबत त्याला अनेक वेळा सल्लाही दिला होता. (photo indian express)
-
एकदा सलमानने सिद्धार्थला रागावर नियंत्रण ठेवण्याच्या टिप्स दिल्या. सलमान आणि सिद्धार्थमध्ये असलेली खास बॉण्डींग आपल्याला शोमध्ये पाहायला मिळाली होती.
-
रागाच्या भरात सिद्धार्थ इतका वेडा व्हायचा की त्याची तब्येत बरेच दिवस खराब राहायची. हे टाळण्यासाठी सलमानने त्याला राग येताच जमिनीवर झोपण्याची युक्ती शिकवली.
-
या युक्तीनंतर अनेक वेळा सिद्धार्थ अचानक जमिनीवर झोपलेला आणि झोपून भांडताना दिसला, पण सलमानची युक्ती प्रभावी ठरली.
-
सिद्धार्थ झोपून जास्तवेळ भांडू शकत नव्हता. शहनाज गिल सतत म्हणत असे की, कुटुंबातील सदस्य त्याला मुद्दाम भांडायला प्रवृत्त करतात.
-
कधी सलमान त्याला टोमणे मारायचा तर कधी विनोद करायचा. (photo indian express)
-
शो दरम्यान हे उघड झाले की सिद्धार्थ त्याच्या आयुष्यात त्याच्या वडिलांवर सर्वात जास्त प्रेम करायचा. त्याने लहान वयातच वडिलांना गमावले. एकदा असीमने त्याच्या वडिलांवर टिप्पणी केली होती, तेव्हा तो असीमला मारण्यासाठी गेला होता. (photo indian express)
-
दरम्यान, सलमान खानने सिद्धार्थच्या निधनावर ट्विट केले. या ट्वीटमध्ये “खूप लवकर गेलास सिद्धार्थ. तुझी आठवण येत राहील. कुटुंबाप्रती माझी संवेदना. आत्म्यास शांती लाभो,” असे कॅप्शन सलमानने दिले आहे.

माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”