-
बोल्ड फोटोशूट किंवा न्यूड फोटोशूट हे साधारणपणे बॉलिवूड अभिनेत्रींनी केल्याचं साऱ्यांनीच पाहिलं आहे. त्यांच्या तुलनेत मराठी अभिनेत्रींनी मात्र असं न्यूड फोटोशूट करण्याचं धाडस केल्याचं अद्याप कोणाच्याही पाहण्यात नसेल. परंतु, या सगळ्याला छेद दिला तो अभिनेत्री वनिता खरातने.
-
२०१९मध्ये आलेल्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटात वनिताने पुष्षा (शाहिद कपूरची मोलकरीण) ही भूमिका साकारली होती.
-
काही महिन्यांपूर्वी न्यूड फोटोशूट करुन वनिता चर्चेत आली. विशेष म्हणजे सर्व स्तरांमधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
-
आता वनिताने आणखी एक नवे बोल्ड फोटोशूट केले आहे.
-
सौंदर्याची परिभाषा ही रंग, रुप किंवा देहरचनेवर आधारित नसून खरं सौंदर्य हे आत्मविश्वास आणि स्वत: वर असलेलं प्रेम यावर आधारित आहे हे वनिताने दाखवून दिलं.
-
या फोटोशूटमधील काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
‘जिस दिन तुमको देखेगी नजर.. जाने दिल पर होगा क्या असर..’ असे कॅप्शन देत वनिताने हे फोटो शेअर केले आहेत.
-
या लूकमध्ये वनिता हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे.
-
आपल्या वजनाचा आणि शरीराबद्दलचा कोणताही न्यूनगंड न बाळतगता वनिताने बोल्ड फोटो शेअर केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वनिता खरात / इन्स्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल