-
मराठी कलासृष्टीतील अनेक कपल आहेत ज्यांनी त्यांच्या प्रेग्नसीची बातमी लावपुन ठेवली आणि नंतर एका अनोख्या अंदाजत जगाला सांगितली. पाहुयात कोण आहेत ते सेलिब्रेटी.
-
‘देवयानी’ या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता संग्राम साळवी आणि त्याची पत्नी खुशबू तावडे हे आई-बाबा होणार आहेत. संग्रामने ही बातमी ५ सप्टेंबरला खुशबूच्या वाढदिवसाच्या निमित्ता दोघांचा एक खास फोटो शेअर करत दिली.
-
‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता आरोह वेलणकरने पत्नी अंकिता शिंगवीच्या डोहाळजेवणाचे फोटो त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिली होती.
-
उर्मिला निंबाळकरने ती प्रेग्नंट असल्याची माहिती इन्स्टाग्राम अकाऊंटवर बेबी बंपसोबतचा फोटो शेअर करत दिली होती. तसंच या फोटोमुळे तिला काही नेटकाऱ्यांनी ट्रोल केलं होतं. ३ ऑगस्ट रोजी उर्मिला निंबाळकरने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
-
‘लाडाची गं लेक’ या मालिकेतील अभिनेत्री स्मिता तांबे हिच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे. ती प्रेग्नंट असल्याची बातमी तिने डोहाळजेवणाचे फोटो आणि एक खास व्हिडिओ शेअर करत दिली होती.
-
गायिका सावनी रवींद्रने पती डॉ. आशिष धाडे सोबत डोहाळजेवणाचे फोटो शेअर करत ती आई हिणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. तिनला मुलगी झाली आहे.
अभिनेत्री धनश्री कडगावकर हिने तिच्या प्रेग्नसीची घोषणा एक म्युझिक व्हिडिओ शेअर करत दिली होती. तसंच तिने शेअर केलेले फोटो सुद्धा चांगलेच चर्चेत होते. (Photo-Instagram)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन