-
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते.
-
शेरशाह चित्रपटातील अभिनयासाठी तिचे नेहमीच कौतुक केले जाते.
-
या चित्रपटामुळे सिनेसृष्टीतील कारकिर्दीला एक वेगळे वळण मिळाले आहे.
सध्या कियारा अडवाणीला चित्रपटात घेण्यासाठी अनेक निर्माते उत्सुक आहे. मात्र तिच्याकडे अनेक चित्रपट असल्याने तिने त्यासाठी नकार दिला आहे. -
पण बॉलिवूडमध्ये तिने यापूर्वी अनेक चित्रपट नाकारले आहेत. या चित्रपटांच्या यादीत अनेक हिट चित्रपटांचाही समावेश आहे.
हाऊसफुल ४ – व्यस्त कामामुळे कियाराने हा चित्रपट नाकारला होता. त्यामुळे कियाराच्या जागी कृती खरबंदाला या चित्रपटात रिप्लेस करण्यात आले होते. सिम्बा – या चित्रपटात रोहित शेट्टीला कियारा आडवाणीला मुख्य अभिनेत्री म्हणून घ्यायचे होते. मात्र त्याचवेळी सारा अली खान रोहित शेट्टीकडे काम मागण्यासाठी आली होती. त्यामुळे त्याने तिला अभिनेत्री म्हणून घेण्याचा निर्णय घेतला. -
अपूर्वा – महिलांच्या विषयावर असलेला हा चित्रपट कियाराने शीर्षकामुळे नकार दिला होता.
स्टुडंट ऑफ द इअर – कियाराने स्टुडंट ऑफ द इअरसाठी ऑडिशन दिले होते. मात्र चित्रपट निर्मात्यांनी आलिया भट्टला यात लाँच करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिला हा चित्रपट मिळाला नाही. -
घानी – बॉलिवूडमध्ये करिअर करण्याच्या हेतूने कियाराने हा चित्रपट नाकारला होता.
-
फायटर – या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कियाराने काही अवधी मागितला होता. मात्र निर्मात्यांनी तिच्याऐवजी अनन्या पांडेला चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला.

२१ फेब्रुवारी राशिभविष्य: अनुराधा नक्षत्रात हातातील कामांना मिळेल यश तर कोणाला लाभेल जोडीदाराचा सहवास; वाचा तुमचा शुक्रवार कसा जाणार