-
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा आज ३७ वा वाढदिवस. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आयुष्मानने अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.
-
आयुष्मानचे अनेक चित्रपट हे कमी बजेटच्या चित्रपटात काम केले असले तरी ते बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतात.
-
आयुष्मान खुरानाचा जन्म १४ सप्टेंबर १९८४ मध्ये चंदीगडमध्ये झाला. त्याचे वडील पी. खुराना हे चंदीगडमधील प्रसिद्ध ज्योतिषी होते.
-
आयुष्मानने त्याचे संपूर्ण शिक्षण हे चंदीगडमध्येच पूर्ण केले. इंग्रजी साहित्यात पदवी घेतल्यानंतर त्याने मास कम्युनिकेशनमध्ये एमए केले आहे.
-
त्याचे वडील हे पत्रकार म्हणून नोकरी करत असले तरी ते रंगभूमीशी जोडलेले होते.
आयुष्मानने चंदीगडमध्ये ‘आगाझ’ आणि ‘मंचतंत्र’ नावाचे नाटकाचा ग्रुप सुरु केला असून तो अजूनही सक्रिय आहे. -
आयुष्माने त्याच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. तो पहिल्यांदा टेलिव्हिजनवरील एमटीवी रोडीज या रिअॅलिटी शो मध्ये झळकला होता.
-
हा शो जिंकल्यानतंर त्याच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तो रेडिओमध्ये आर. जे म्हणून काम करायचा. त्यानंतर आयुष्मानने विविध चॅनलवर शो देखील होस्ट केले आहेत. त्यामुळे तो घराघरात ओळखला जाऊ लागला.
-
आयुष्मानसाठी २०१२ हे वर्ष फार खास ठरले. या वर्षात त्याने विकी डोनर या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.
-
विकी डोनर या चित्रपटासाठी आयुषमानला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
तर ‘पानी दा रंग’ या गाण्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट गायक म्हणून सन्मानित करण्यात आले. ‘विकी डोनर’ या चित्रपटानंतर आयुष्मानने ‘दम लगाके हाईसा’, ‘बरेली की बर्फी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘अंधाधून’, ‘बधाई हो’, ‘अर्टिकल १५’, ‘ड्रीम गर्ल’, ‘बाला’ आणि ‘शुभमंगल ज्यादा’ सावधान यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. आयुष्मानने सलग सात सुपरहिट चित्रपटात काम केले असून तो नेहमी विविध भूमिकांसाठी ओळखला जातो. -
कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असणारा आयुष्मान अनेकदा त्याच्या जीवनात घडणाऱ्या लहान-लहान गोष्टीदेखील चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
कलाविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून आयुष्मान-ताहिराकडे पाहिलं जातं. कॉलेजजीवनापासून एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या जोडीने काही वर्ष डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधली. त्यांना विराजवीर आणि वरुष्का ही दोन मुलंदेखील आहेत.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख