-
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.
-
प्राजक्ता ही सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असते.
-
प्राजक्ताने नुकतचं एक नवं फोटोशूट केलं आहे.
-
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्ताने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
यात तिने हिरव्या रंगाची सोनेरी बॉर्डर असलेली साडी परिधान केली आहे.
-
“आज पाहता साडीमध्ये, मनी येईल पुन्हा प्रेमाचा मोहर, नखरेल नथीची शोभा, देईल सौंदर्याला अधिक बहार,” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
-
या साडीत तिचे सौंदर्य फार खुलून दिसत आहे.
-
मराठी साज चढवलेली प्राजक्ता छान रुबाबात पाहायला मिळत आहे.
-
सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताच्या या फोटोची चर्चा रंगली असून त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे.
-
उत्तम अभिनयशैली आणि गोजिरवाणा चेहरा म्हणून प्राजक्ताची खास ओळख आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्राजक्ताचा फॅन फॉलोइंगसुद्धा मोठा आहे. (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड /इन्स्टाग्राम)
मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळं बेळगावमध्ये वाहकाला मारहाण; महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद