-
दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ या चित्रपटातून पदार्पण केलेला आणि घराघरात परिचयाचा झालेला अभिनेता म्हणजे आकाश ठोसर.
-
उत्तम अभिनयासोबतच आकाशच्या एका स्माइलवर अनेक तरुणी घायाळ होतात. त्यामुळे आकाशची तरुणींमध्ये तुफान क्रेझ आहे.
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणारा आकाश अनेकदा त्याचे नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो.
-
अभिनयाप्रमाणेच आकाश त्यांचा लूककडेही विशेष लक्ष देत असतो.
-
आकाशने नुकतंच फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
-
अनेक चाहत्यांना आकाशचा हा लूक प्रचंड आवडला आहे.
-
आकाशच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
अभिनयात येण्याआधी आकाश कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी सोलापुरला गेला होता. इथेच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची नजर त्याच्यावर पडली. त्यांनी आकाशला सैराट चित्रपटासाठी विचारणा केली. इथून आकाशचा अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरु झाला.
-
सैराटच्या यशानंतर आकाशने ‘फ्रेन्डशीप अनलिमिटेड’ आणि ‘लस्ट स्टोरी’ या चित्रपटांमध्ये काम केलं.
-
लवकरच आकाश नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : आकाश ठोसर / इन्स्टाग्राम)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच