-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते?’
-
या मालिकेतील प्रत्येक पात्र हे कायम चर्चेत असते.
-
अरुंधती, अनिरुद्ध, संजना यांच्यामधील संवाद सतत सोशल मीडियावर चर्चेत असतात.
-
अनिरुद्ध आणि संजनाचे लग्न झाल्यानंतर मालिकेत नवे वळण आले आहे.
-
संजना आणि कुटुंबीयांमध्ये सतत वाद होत असल्याचे पाहायला मिळते.
-
तसेच अप्पांनी घर अरुंधती आणि अनिरुद्धच्या नावावर केल्यामुळे अरुंधती देशमुख कुटुंबीयांसोबत राहताना दिसत आहे.
-
पण लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे हे कलाकार एका भागासाठी किती मानधन घेत असतील असा प्रश्न अनेकांना पडत असेल.
-
चला जाणून घेऊया अरुंधती, अनिरुद्ध, संजना यांच्या मानधनाविषयी..
-
मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने साकारली आहे.
-
मधुराणी ही एका भागासाठी जवळपास २५ हजार रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
मधुराणी इतर कलाकारांच्या तुलनेत सर्वाधिक मानधन घेते.
-
संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसलेने साकारली आहे.
-
रुपाली एका भागासाठी १७ हजार रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
-
अभिनेता मिलिंद गवळी अनिरुद्धची भूमिका साकारत आहे.
-
तो एका भागासाठी २० हजार रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार