-
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचं कथानक काही वर्षांनी पुढे सरकलं आहे.
-
त्यामुळे आता या मालिकेत दिपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली दीपिका आणि कार्तिकी या मोठ्या झाल्या आहेत.
दीपिका आणि कार्तिकी या दोघींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मालिकेतील कार्तिकी नक्की कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव आहे साईशा भोईर. साईशा ही सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहे. -
साईशाचे सोशल मीडियावर ९१ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहे.
-
साईशाने काही दिवसांपूर्वी एका नामांकित ब्रँडसाठी रॅम्पवॉक केले होते.
-
साईशा तिच्या कुटुंबासोबत कल्याणमध्ये राहते.
-
साईशाच्या वडिलांचे नाव विशांत भोईर असे असून त्यांना गाण्याची आणि ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे.
-
साईशाचे सोशल मीडियावर फार सक्रीय असून तिचे स्वत:चे युट्यूब चॅनलही आहे.
साईशाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नृत्य, अभिनय, जेवण बनवतानाचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. साईशा ही सोशल मीडिया स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. -
‘रंग माझा वेगळा’ ही साईशाची पहिली मालिका आहे.
-
स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून साईशा दिपा आणि कार्तिकची मुलगी कार्तिकीची भूमिका साकारत आहे.
-
सध्या दिपा कार्तिकीला एकटीच सांभाळताना दिसत आहे.
-
त्यामुळे कार्तिकी आणि दीपिका यांच्यामुळे त्यांचे आई वडील पुन्हा एकत्र येणार का? हे पाहणे फार महत्त्वाचे ठरणार आहे.
-
(सर्व फोटो -साईशा भोईर/ इन्स्टाग्राम)
सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात