-
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि पती नागा चैतन्यची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्या दोघांचा घटस्फोट झाल्याची बातमी समांथाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे.
-
त्यांच्यात आलेल्या या दुराव्यामुळे चाहते दु: खी आहेत, कारण या बातमीमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. यात आता समांथाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
हा व्हिडीओ एका मुलाखतीतला आहे. यावेळी समांथाने नागा चैतन्यच्या पहिल्या पत्नी विषयी सांगितले आणि ती नेहमी त्या दोघांच्या मध्ये येते असा खुलासा तिने केला आहे.
-
एकदा समांथाने लक्ष्मी मंचूचा चॅट शो ‘फीट अप विथ द स्टार्स’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी समांथाने तिच्या आणि नागा चैतन्यच्या बेडरूम सिक्रेटविषयी सांगितले.
-
२०१७ मध्ये लग्न करण्या आधी ते दोघे बराच वेळ लिव्ह-इनमध्ये होते. ‘जेव्हा तू सिंगल होतीस तेव्हा पासून रिलेशनशिपमध्ये येई पर्यंत तुझ्या बेडरूममध्ये कोणत्या तीन गोष्टी बदलल्या आहेत?’ असा प्रश्न समांथाला विचारण्यात आला होता.
-
या प्रश्नाचे उत्तर देताना समांथाने नागा चैतन्यच्या पहिल्या पत्नी विषयी खुलासा केला होता. ‘उशी त्याची पहिली पत्नी आहे. जेव्हा मला त्याला कधी करायचं असेल तर उशी नेहमीच आमच्यामध्ये येते,’ असे समांथा म्हणाली होती.
-
समांथाने नागा चैतन्यशी लग्न केल्यानंतर अक्किनेनी हे आडनाव लावण्यास सुरुवात केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी समांथाने तिचं हे आडनाव सोशल मीडियावरून हटवलं होतं. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
-
दरम्यान, ‘फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजमध्ये समांथाने बोल्ड भूमिका साकारली होती. त्याचा परिणाम हा नागा चैतन्य आणि तिच्या वैवाहिक जीवनावर पडला आहे. यामुळे ते दोघे विभक्त होणार आहेत अशा चर्चा सुरु आहेत.
-
एवढंच नाही तर अलीकडेच त्या दोघांनी कौटुंबिक न्यायालयात जाऊन वकिलाची भेट घेतली असे म्हटले जात आहेत. आता या गोष्टी कितपत खऱ्या आहेत हे तर येत्या काळात कळेल.
-
समांथा आणि नागा चैतन्य हे २०१० मध्ये रिलेशनशिपमध्ये आले. त्या दोघांनी गोव्यात ६ ऑक्टोबर २०१७ रोजी लग्न केले. समांथा आणि नागा चैतन्य चित्रपटाच्या सेटवर रिलेशनशिपमध्ये आले होते. (All Photo Credit : Samantha Ruth Prabhu Instagram)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख