-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो बिग बॉस मराठी सिझन ३ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या तिसऱ्या सिझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. चला जाणून घेऊया बिग बॉस मराठी ३ मधील स्पर्धकांची नावे..
-
‘बिग बॉस मराठी ३’ च्या घरात पहिला प्रवेश करणारण्याचा मान अभिनेत्री सोनाली पाटीलला मिळाला आहे. कोल्हापूरची सोनाली कोणतीही स्ट्रॅटजी न वापरता या खेळात सहभाग घेणार असल्याचं म्हणाली आहे. वैजू नंबर १ या मालिकेसह सोनालीने अनेक मालिकांमध्ये काम केलंय.
-
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेमुळे घराघरात पोहचलेला अभिनेता विशाल निकम बिग बॉसमध्ये सहभागी झाला आहे.
-
मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करत अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री स्नेहा वाघ आता बिग बॉस मराठी सिझन ३मध्ये दिसणार आहे. बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणारी स्नेहा ही तिसरी स्पर्धक आहे.
-
आपल्या दमदार आवाजामुळे घराघरात पोहचलेल्या आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष शिंदेने ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात प्रवेश केलाय. उत्कर्ष उत्तम गायक आहेच.
-
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री मिरा जगन्नाथ आता बिग बॉस मराठी सिझन ३च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.
-
कलाकारांव्यतिरिक्त या शोमध्ये कोण सामील होणार अशी प्रेक्षकांना उत्सुकता होती. सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई या बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत.
-
असंख्य मराठी मालिकांसोबत, नाटक आणि सिनेमांमध्ये आपली ओळख निर्माण केलेला अभिनेता आविष्कार दारव्हेकर ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाला आहे.
-
‘स्वाभिमान’ या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे.
-
अनेक मालिकांमधून विविध भूमिकांमधून झळकलेला अभिनेता विकास पाटील ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये सामील झालाय. नुकताच तो कलर्सवरील बायको अशी हवी मालिकेत झळकला होता.
-
‘तुला पाहते रे’ या मालिकेत इशा निमकरची भूमिका साकारात प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री गायत्री दातार आता बिग बॉसच्या घरात सहभागी झाली आहे. मालिकेत साध्या, सरळ इशाची भूमिका साकारणारी गायत्री खऱ्या आयुष्यात कशी आहे हे आता बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहे.
-
किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील अवघ्या पाच वर्षांची असल्यापासून किर्तन करत आहे. आजवर १० हजारांहून अधिक किर्तनांचा टप्पा तिने पार केलाय. खास करून तरुण पिढीचं नेतृत्व करणारी शिवलीला तरुणांसाठी समाजप्रबोधनाचं काम करते. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता शिवलीला तिच्या किर्तनाच्या जादूने स्पर्धकांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण करण्यासाठी सज्ज आहे.
-
MTV वरील अतिशय लोकप्रिय शो ‘स्प्लिट्सविला’च्या माध्यमातून लाखो तरुणींच्या मनावर राज्य करणारा जय दुधाणे आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. स्प्लिट्सविलानंतर आता बिग बॉस मराठी सिझन ३मध्ये जयचा गेम पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
-
रोडिज या लोकप्रिय ठरलेल्या रिअॅलिटी शोनंतर आता मीनल शाह ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये सामील झालीय. मीनल डिजिटल क्रिएटर आणि डान्सर आहे.
-
‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळी यांचा जावई अभिनेता अक्षय वाघमारे आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.
-
मराठीचा बप्पी लहिरी अर्थात आगरी कोळी संगीताचा बादशाह ‘दादूस’ म्हणून ओळखला जाणारा गायक संतोष चौधरीची बिग बॉस मराठी सिझन ३मध्ये एण्ट्री झाली आहे.
कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO