-
अभिनेता अभय देओल हा हटके भूमिका साकारणारा आणि साचेबद्ध अभिनयाऐवजी वेगवेगळे प्रयोग करणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो.
-
‘जिंदगी मिलेगी न दोबारा’, ‘देव डी’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या भूमिकांचं कौतुक झाल्याचं आपल्याला पहायला मिळालं आहे.
-
‘चॉपस्टीक्स’, ‘जेएल ५०’सारख्या केवळ इंटरनेटवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका हटकेच ठरल्या. त्या प्रेक्षकांनाही तितक्याच आवडल्या.
-
अभय देओल सोशल नेटवर्किंगवरही फार चर्चेत असतो. अनेकदा सोशल नेटवर्किंगवरुन तो आपले मुद्दे रोखठोकपणे मांडताना दिसतो.
-
अभय देओलला सोशल नेटवर्किंगवर आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर करायला आवडत नाही.
-
अभय देओल हा प्रीति देसाईसोबत फार काळापासून रिलेशनशिपमध्ये होता.
-
मध्यंतरी अभय आणि प्रीतिचं ब्रेकअप झालं. त्यानंतर आता अभयच्या आयुष्यात नवीन तरुणी आल्याचं सांगितलं जात आहे.
-
अभयने शिलो शिव सुलेमानसोबत काही मादत फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमुळेच दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
अभयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो शिलो शिव सुलेमानचे चुंबन घेताना आणि तिच्या गालाजवळ तोंड ठेऊन पोज देताना दिसत आहे.
-
अभयने शिलो शिव सुलेमानसोबतच्या या फोटोंना दिलेली कॅप्शनही फार चर्चेत आहे. पण त्याआधी ही शिलो नावाची तरुणी आहे तरी कोण ते पाहूयात.
-
शिलो ही एक ट्रायबल आर्टीस्ट म्हणजेच आदिवसी कलांमध्ये पारंगत असणारी कलाकार आहे.
-
शिलो ही सोशल नेटवर्किंगवर प्रचंड सक्रीय असून ती वेळोवेळी साचेबद्ध विचारसणीला छेद देणाऱ्या पोस्ट शेअर करत असते.
-
शिलो ही जगभरामध्ये तिच्या हटके कलाकृतींसाठी ओळखली जाते.
-
इन्स्टाग्रामवरुन ती अनेकदा तिचे फोटो पोस्ट करत असते. तिने मांडलेल्या विचारांशी अनेकजण सहमत असल्याचं दिसून येतं.
-
इन्स्टाग्रामवर शालोचे ५० हजारांहून अधिक फॉलोअर्स असून आता अभयने तिच्या सोबतचा फोटो शेअर केल्याने ती चर्चेत आलीय.
-
या फोटोंना कॅप्शन देताना अभयने ‘फ्री, फॉलोइंग, क्रिएटिव, फन, निडर, शांत और टॅलेंटेड, सेन्सुअल, सेक्सी…. ओह शिलोमध्ये या सर्वच घोष्टी आहेत,” असं म्हटलंय.
-
यावर शिलोने रिप्लाय करताना आणखीन अॅडव्हेंचर बाकी असल्याचं म्हटलं आहे.

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?