-
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. काही वेळा लोक मानसिकरित्या तर कधी आर्थिकरित्या संघर्षाचा सामना करत असतात. केवळ सामान्य जनतेला अशा अडचणींना सामोरे जावे लागत नाही, तर अनेक सेलिब्रिटींना कधी ना कधी आर्थिक अडचणींचा सामना केला आहे.
-
आज आपण अशाच काही सेलिब्रिटींबद्दल जाणून घेणार आहोत. जे एकेकाळी बेरोजगार झाले होते, पण नंतर त्यांनी त्या अडचणीचा सामना करत छोट्या पडद्यावर पुन्हा स्वत:ची जागा निर्माण केली.
-
दिलीप जोशी – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांचे लाखो चाहते आहेत. ‘तारक मेहता…’ या मालिकेत ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. (Photo Credit : Dilpi Joshi Instagram)
-
‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत दिलीप यांनी ते बेरोजगार होते तेव्हाच्या परिस्थितीबद्दल सांगितले आहे. “अभिनय व्यवसाय हा एक धोकादायक व्यवसाय आहे. तुमचे वय कितीही झाले तरी तुम्ही कधीही सुरक्षित नसता. ‘तारक मेहता…’ मालिकेत काम करण्याआधी मी बेरोजगार होतो,” असे दिलीप जोशी म्हणाले. (Photo Credit : Dilpi Joshi Instagram)
-
शाहीर शेख – ‘महाभारत’ या मालिकेतून घरा घरात पोहोचलेला शाहीर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कामात व्यस्त आहे. मात्र, एक वेळी अशी होती की त्याच्याकडे एक काम नव्हते. (Photo Credit : Shaheer Sheikh Instagram)
-
शाहीरने ‘झूम’ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत शाहीरने त्याच्या आर्थिक अडणींदबद्दल सांगितले होते. ” ‘महाभारत’ या मालिकेत काम करण्यााधी त्याच्याकडे एकही काम नव्हते,” असे शाहीर म्हणाला होता. (Photo Credit : Shaheer Sheikh Instagram)
-
सुमोना चक्रवर्ती – ‘द कपिर शर्मा शो’ मालिकेतील सुमोना ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी सुमोनाने इन्स्टाग्रामवर बेरोजगार होण्यावर एक नोट शेअर केली होती. “कदाचित मी बेरोजगार होऊ शकते. तरीही मी माझ्या कुटुंबाला आणि स्वतःला पोसू शकते. कधीकधी मला वाईट वाटते. मला काय होते काही कळत नाही. मी याआधी कधीही सांगितले नाही की, २०११ पासून मी एंडोमेट्रियोसिसशी लढा देत आहे.” (Photo Credit : Sumona Chakravarti Instagram)
-
रोनित रॉय – ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेता रोनित रॉय तर ४ वर्ष बेरोजगार होता अशी चर्चा होती. एवढंच नाही तर बेरोजगार झाल्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता असे देखील म्हटले जात होते. (Photo Credit : Ronit Boseroy Instagram)
-
‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रोनित म्हणाला, “माझा पहिला चित्रपट ‘जान तेरे नाम’ १९९२ मध्ये प्रदर्शित झाला होता. जो सुपरहिट झाला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुढील सहा महिने मला कोणत्याही कामासाठी फोन आला नाही. मी चार वर्षे घरी बसून होतो. माझ्याकडे एक छोटी गाडी होती, पण माझ्याकडे पेट्रोलसाठी पैसे नव्हते. मी माझ्या आईच्या घरी जेवणासाठी जायचो, कारण माझ्याकडे पैसे नव्हते.” (Photo Credit : Ronit Boseroy Instagram)
-
मनीष पॉल – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सुत्रसंचालक मनीष पॉल करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये एक वर्ष बेरोजगार होता. एका मुलाखतीत त्याने या विषयी सांगितले होते. (Photo Credit : Maniesh Paul Instagram)
-
बेरोजगार असताना त्याच्या पत्नीने त्याला कसे सांभाळून घेतले आणि त्याला आधार दिला त्याविषयी मनीषने सांगितले. “माझ्यासोबत राहिल्यानंतर संयुक्ता शाळेत शिक्षकाची नोकरी करू लागली. मी माझे काम आणि सुत्रसंचालनाचे काही प्रोजेक्ट्स करत होतो. आम्ही क्वचितच भेटायचो, पण तिने कधीही तक्रार केली नाही, एकदाही नाही. मग २००८ मध्ये माझ्याकडे संपूर्ण वर्ष काम नव्हतं. माझ्याकडे घराचे भाडे देण्यासाठी पैसेही नव्हते. त्यावेळी, संयुक्ताने सर्व गोष्टींची काळजी घेतली.” (Photo Credit : Maniesh Paul Instagram)
-
रीम शेख – छोट्या पडद्यावरील ‘तुझसे है राब्ता’ फेम रीम शेख एकदा म्हणाली होती की ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ या मालिकेनंतर तिला २ वर्ष काम मिळाले नव्हते. ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रीम म्हणाली, “हा एक ब्रेक होता, कारण खरंच मला काम मिळालं नव्हतं.” (Photo Credit : Reem Sameer Shaikh Instagram)
-
निया शर्मा – निया शर्माने एका मुलाखतीत तिच्या संघर्षा विषयी सांगितले होते. ‘एक हजारों मी मेरी बेहना है’ शो बंद झाल्यानंतर जवळपास एक वर्ष ती बेरोजगार होती. “जेव्हा मी या इंडस्ट्रीत आले होते, तेव्हा मी माझ्यातच रहायची. मला ‘एक हजार में मेरी बेहना है’ या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. यानंतर पूर्ण एक वर्षा माझ्याकडे काम नव्हतं. (Photo Credit : Nia Sharma Instagram)
-
शार्दुल पंडित – ‘बिग बॉस’ फेम शार्दुल पंडित करोना काळात शार्दुलची बिकट परिस्थिती होती. त्याला काम मिळत नव्हते. त्याने आर्थिक अडचणींचा सामाना केला. याविषयी त्यांने एका मुलाखतीत सांगितले होते. (Photo Credit : Shardul Pandit Instagram)
-
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत शार्दुल म्हणाला, “बिग बॉस’ घरातून बाहेर पडल्यानंतर मला व्हॅनिटीमध्ये नेण्यात आले. तिथे मी सलमान भाईशी एक मिनिट बोलण्याची विनंती केली. मी रडू शकत नव्हतो, कारण मला पैशांसाठी शोची आवश्यकता होती.” (Photo Credit : Shardul Pandit Instagram)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई