-
साउथचे लोकप्रिय कपल नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभु यानी अखेर विभक्त होत असल्याचं जाहीर केलंय.
-
समांथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त होत होत असल्याचं जाहीर केलंय. या बातमीने चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.
-
समांथा आणि नागा चैतन्यने त्यांच्या पोस्टमध्ये खूप विचार केल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.
-
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ सालामध्ये समांथा आणि नागा चैतन्याने गोव्यामध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं.
-
अवघ्या चार वर्षात दोघं विभक्त होत आहेत.
-
समांथा आणि नागा चैतन्याची लव्हस्टोरी देखील खास होती.
-
२००९ सालामध्ये ‘ये माया चेसवे’ या सिनेमाच्या सेटवर समांथा आणि नागा चैतन्यची पहिली भेट झाली. या सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस पडली होती
-
. मात्र यावेळी दोघंही वेगवेगळ्या व्यक्तींना डेट करत होते.
-
नागा चैतन्य यावेळी श्रुती हसनला डेट करत होता. तर समांथा सिद्धार्थला.
-
२०१३ सालात नागा चैतन्य आणि श्रुतीचं ब्रेकअप झालं. तर समांथा आणि सिद्धार्थमध्ये देखील फूट पडली
-
२०१४ सालामध्ये सुर्या सिनेमात दोघांनी पुन्हा एकत्र काम केलं. यावेळी मात्र त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
-
२०१५ सालामध्ये नागा चैतन्यला समांथाने सोशल मीडियावरून त्याला वाढदिवसानिमित्ताने क्यूट मेसेज लिहित शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी दोघांमध्ये काही तरी शिजत असल्याच्या चर्चांना अधिक रंग चढला.
-
“”माझ्या कायमच आवडत्या असलेल्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हे एक उत्तम वर्ष असणार आहे.” असं ती ट्वीटमध्ये म्हणाली होती.
-
तर नागा चैतन्यने २०१६ सालामध्ये एका रोमॅण्टिक ट्रिपवर समांथाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं.
-
नागा चैतन्यने सर्वात आधी वडिलांना म्हणजेच नागार्जुन यांना त्याच्या आणि समांथाच्या नात्याबद्दल सांगितलं होतं.
-
२०१७ सालामध्ये समांथा आणि नागा चैतन्यने गोव्यामध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केलं.
-
६ ऑक्टोबर २०१७ ला त्यांनी हिंदू प्रथेप्रमाणे लग्न केलं
-
तर दुसऱ्या दिवशी त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं.
-
दोघांच्या या शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
-
समांथा आणि नागा चैतन्याच्या लग्नाएवढीच चर्चा त्यांच्या हनीमूनची झाली. तब्बल ४० दिवस त्यांनी हनीमून एन्जॉय केलं
-
लग्नानंतर संपूर्ण जगातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्याचं त्यांनी ठरवलं होतं.
-
या क्यूट कपलच्या विभक्त होण्याने त्यांच्या चाहत्यांना दु:ख आहे.
-
समांथा आणि नागा चैतन्याच्या विभक्त होण्यामागचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी समांथाच्या करियरमुळे दोघांमध्ये फूट पडल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.
-
समांथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सासरचं नाव काढून टाकल्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं.
-
त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये तसचं नागा चैतन्यच्या ‘लव्हस्टोरी’ सिनेमाच्या लॉन्च सोहळ्यात समांथाची गैरहजेरी दिसून आली.
-
समांथा आणि नागा चैतन्यने विभक्त होण्याचा निर्णय अखेर सर्वांसमोर जाहीर केला. तसचं चाहत्यांनी साथ द्यावी असं त्यांनी यावेळी म्हंटलंय.

“मी एकटाच वेगळा…”, नाना पाटेकरांनी पत्नीबरोबर न राहण्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिचे खूप उपकार…”