-
अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसबी) शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकत १२ लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये ९ पुरुष आणि ३ मुलींचा समावेश आहे.
-
याप्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
-
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानने कबूल केले की तो या पार्टीचा भाग होता. त्याने चूक केल्याची कबुलीही दिली आहे.
-
अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खानला ताब्यात घेतले आहे.
-
या प्रकरणी समीर वानखेडे म्हणाले की, आर्यन खानवर कोणत्याही आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा त्याला आतापर्यंत अटकही करण्यात आलेली नाही.
-
खास गोष्ट म्हणजे समीर वानखेडे हे मराठी चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरचे (Kranti Redkar) पती आहेत.
-
२०१७ मध्ये क्रांती आणि समीर यांचे लग्न झाले. या दाम्पत्याला जुळ्या मुली आहेत.
-
समीर वानखेडे आय आर एस म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे ऑफिसर आहेत. यापूर्वीही समीर यांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सच्या घरी धाडी टाकल्या आहेत.
-
विवेक ओबेरॉय, अनुराग कश्यप, रामगोपाल वर्मा यासारख्या दिग्गज सेलिब्रेंटींच्या घरावर समीर वानखेडे यांनी धाडी टाकल्या आहेत.
-
२०१३ साली बेकायदेशीर पद्धतीने परदेशी चलन बाळगल्याप्रकरणी प्रसिद्ध गायक मिका सिंग याला मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. ही कारवाईही समीर यांनीच केली होती
-
समीर वानखेडे २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत.
-
त्यांची पहिली पोस्टिंग मुंबई विमानतळावर डिप्टी कस्टम कमिश्नर म्हणून झाली झाली होती.
-
कस्टममधून त्यांची बदली नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनबीसी)मध्ये करण्यात आली आहे. मागील दोन वर्षात समीर वानखेडे यांनी १७ हजार कोटींपेक्षा जास्त ड्रग्ज पकडलं आहे
-
सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये अंमली पदार्थांसंदर्भातील खुलासा समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपासही समीर यांच्याकडे सोपवण्यात आला.
१४ फेब्रुवारी पंचांग: सुकर्मा योगात १२ राशींचा कसा जाणार दिवस? कोणाला राहावे लागेल मतांवर ठाम, तर कोण होईल धनवान; वाचा तुमचे राशिभविष्य