-
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो चित्रपटसृष्टीपासून लांब असला तरी खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसबी) ताब्यात घेतलं आहे.
-
शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकत १२ लोकांना अटक केली होती. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानने तो या पार्टीचा भाग होता आणि त्याने चूक केली याची कबुलीही दिली आहे.
-
आर्यन खानवर अद्याप कोणत्याही आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच त्याला आतापर्यंत अटकही करण्यात आलेली नाही, अशी माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली.
-
दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर आर्यन खानचे अनेक जुने फोटो, ट्वीट्स, मुलाखती व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या शाहरुख खान हा पठाण या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.
-
येत्या २०२२ ला हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची अनेक चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
-
विशेष म्हणजे या चित्रपटात शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानही सक्रीय सहभाग घेत आहे. आर्यन या चित्रपटात अॅक्शन सिक्वेन्स करताना पाहायला मिळणार आहे.
-
आर्यन हा पॉप कल्चर आणि हॉलिवूड चित्रपटांचा चाहता आहे. त्यामुळे पठाण या चित्रपटातील अॅक्शन सिक्वेनस हा मॅट्रिक्स आणि बॉन्ड या चित्रपटांप्रमाणे असावा, अशी त्याची इच्छा आहे.
-
आर्यनने कॅलिफोर्नीयामधून त्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याला अभियनाऐवजी चित्रपट निर्माता होण्यात फार रस आहे, असे अनेकदा शाहरुखने सांगितले आहे.
-
आर्यनला इतर स्टार किड्सप्रमाणे लाइमलाईटमध्ये राहणं अजिबात आवडत नाही. तो अनेकदा पापाराझींना बघून लपतो किंवा त्यांना काहीही न कळता त्या ठिकाणाहून निघून जातो.
-
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द लायन किंग’या चित्रपटात आर्यनने सिंम्बा या पात्रासाठी आवाज दिला होता. तर शाहरुखने याच चित्रपटातील मुफासा या पात्राचा आवाज हिंदी डब केला होता.
-
आर्यनचा जन्म १३ नोव्हेंबर १९९७ रोजी दिल्लीमध्ये झाला होता. अनेकदा तो पापाराझींपासून लपत असला तरी तो शाहरुखचा मुलगा म्हणून नेहमीच चर्चेत असतो.
-
आर्यन खानने बालकलाकार म्हणून काही चित्रपटात काम केले आहे. करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात त्याने शाहरुखच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
-
आर्यनने शाहरुख खान, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन या कलाकरांसोबत ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटात काम केले आहे. मात्र त्याच्या या सीनवर कात्री लागली होती. (सर्व फोटो – आर्यन खान, शाहरुख खान/ इन्स्टाग्राम)

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार