-
बॉलिवूड अभिनेता शरद केळकरचा आज वाढदिवस.
-
‘लक्ष्मी’ या अक्षय कुमारच्या चित्रपटात अभिनेता शरद केळकरने छोटी भूमिका साकारली होती.
-
छोट्याशा भूमिकेतही आपली छाप सोडणाऱ्या शरद केळकरने छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात केली.
-
दूरदर्शनवरील मालिकेपासून सुरुवात करणाऱ्या शरदने ‘आक्रोश’, ‘सात फेरे’, ‘उतरन’ आणि ‘एजंट राघव’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय.
-
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर शरद सध्या चित्रपट व वेब सीरिजमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करतोय
-
हिंदी मालिका, चित्रपटांमध्ये काम केलेल्या शरदने काही मराठी चित्रपटामध्येही काम केलं आहे.
-
मनोज वाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘स्पेशल ओपीएस’ या वेब सीरिजमध्ये, तर ‘भूमी’ आणि ‘गोलियों की रासलीला- रामलीला’ या चित्रपटांमध्ये त्याने उल्लेखनीय भूमिका साकारल्या.
-
अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यावेळीही त्याचं विशेष कौतुक झालं होतं.
-
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्याने जिम ट्रेनर म्हणूनही काम केलंय.
-
शरद केळकर लहान असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं.
-
आईला आर्थिकरित्या मदत करण्यासाठी त्याने २००० मध्ये जिम ट्रेनरमधून कामाला सुरुवात केली.
-
सुरुवातीच्या काळात शरदला अडखळत बोलण्याचा त्रास होता. त्यावरही त्याने यशस्वीरित्या मात केली.
-
शरदने ‘बाहुबली’ या हिंदी व्हर्जनमधील चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेला स्वत:चा आवाज दिला.
-
इतकंच नव्हे तर ‘xXx : रिटर्न ऑफ जेंडर केज’ या दीपिका पदुकोणच्या हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधील विन डिझेलच्या भूमिकेलासुद्धा त्याने आवाज दिला.
-
(सर्व फोटो सौजन्य : शरद केळकर / इन्स्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल