-
टीव्हीवर चॅनल बघताना तुम्हाला एकच चित्रपट अनेकदा लागल्याचं पाहायला मिळाला असेल. असाच एक चित्रपट म्हणजे ‘सूर्यवंशम’. जवळपास २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने टीव्हीवर टेलिकास्ट होण्याचा जणू रेकॉर्डच केला आहे.
-
या चित्रपटातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना फार चांगल्या प्रकारे लक्षात आहे. अनेकांना तर हिरा ठाकूर, राधा, गौरी आणि मेजर रंजीत यांसारख्या भूमिकांचे संवाद तोंडपाठ झाले असतील.
-
टीव्हीवर सतत सूर्यवंशम टेलिकास्ट होण्यावरून सोशल मीडियावर बरीच खिल्ली उडवली जाते.
-
आजही सोशल मीडियावर या चित्रपटावरून बरेच मीम्स आणि विनोदसुद्धा व्हायरल होतात.
-
मात्र, टीव्हीवर हा चित्रपट का सतत लागतो? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
-
बॉलिवूडचे शेहनाशह अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यातील एक चित्रपट म्हणजे सूर्यवंशम.
-
२१ मे १९९९ साली सूर्यवंशम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
या चित्रपटाला २२ वर्ष झाली असली तरी आजही या चित्रपटाची चर्चा असते.
-
अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात डबल रोल साकारला होता.
-
सूर्यवंशम हा चित्रपट १९९७ मध्ये आलेल्या तामिळ सिनेमा ‘सूर्यवमसम’चा रिमेक होता.
-
सात कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने त्यावेळी १२ कोटी ६५ हजारांचा गल्ला जमवला होता.
-
‘सेट मॅक्स’ या वाहिनीने हा चित्रपट अजरामर केला आहे. यामुळेच सोशल मीडियावर हा चित्रपट नेहमी चर्चेत असतो.
-
हा चित्रपट जवळपास दर आठवड्यात एका दिवशी ‘सोनी मॅक्स’ या चॅनलवर दाखवला जातो.
-
हा चित्रपट ज्या वर्षी रिलीज झाला त्याच वर्षी ‘सेट मॅक्स’ हे चॅनल लॉन्च झालं होतं.
-
आता ‘सेट मॅक्स’ हे ‘सोनी मॅक्स’ नावाने ओळखलं जातं.
-
‘सूर्यवंशम’ हा चित्रपट आणि सेट मॅक्स चॅनल हे दोन्ही एकाच वर्षी लाँच झाले..
-
त्यावेळी या चॅनलने ‘सूर्यवंशम’ या चित्रपटाचे १०० वर्षांचे राईट्स विकत घेतले आहेत.
-
त्यामुळे हा सिनेमा वारंवार दाखवला जातो, अशी माहिती सोनी मॅक्सच्या मार्केटिंग हेड वैशाली शर्मा यांनी एका मुलाखतीत दिली होती.
-
यामधील २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. याचाच अर्थ पुढील ७९ वर्ष हा चित्रपट सेट मॅक्सवर दाखवला जाणार आहे.
-
या सिनेमाची प्रमुख अभिनेत्री सौंदर्या रघु आता यांचा हा पहिला आणि शेवटचा हिंदी सिनेमा ठरला. १७ एप्रिल २००४ रोजी बंगळुरुजवळ एका विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन