-
करोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणानं साजरा करण्यात येत आहे. आपल्याकडे घटस्थापनेला आणि देवीच्या पुजनाला महत्व असते. तर गुजरातमध्ये गरबा-दांडियाची धूम असते.
-
पश्चिम बंगालमध्येही नवरात्रीला खूप महत्व आहे. बंगालमधील दुर्गा पुजा खूप प्रसिद्ध आहे.
-
घरापासून दूर मुंबईत असलेल्या काही कलाकारांना दुर्गापुजेसाठी जाता आलेलं नाही. त्यामुळे घरची आठवण येत असली तरी यंदा मुंबईतच दुर्गा पुजा साजरी करणार आहेत.
-
यामध्ये अभिनेत्री सायंतनी घोषचाही समावेश आहे. सायंतनीने दुर्गा पुजा आणि नवरात्रीच्या इतर तयारीबद्दल आज तकशी बोलताना माहिती दिलीये.
-
बंगाली असल्यामुळे दुर्गा पुजा आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असं सायंतनी सांगते.
-
घरापासून लांब राहणाऱ्या प्रत्येक बंगाली व्यक्तीचं दुर्गापुजेसाठी घरी जाण्याचं स्वप्न असतं. मात्र, बऱ्याचदा कामामुळे आणि गेल्या २ वर्षांपासून करोनामुळे दुर्गा पुजेला घरी जाता येत नाहीये, असं सायंतनी म्हणाली.
-
कोलकाता कोलकाता आहे, तिथल्या दुर्गा पुजेची सर कुठेच भरून निघत नाही. कुटुंबीय आणि मित्रांसोबत उत्सव साजरे करण्याची मजा वेगळीच असते, असं सायंतनी सांगते.
-
वेगवेगळ्या पंडालमध्ये जाऊन पुष्पांजली देण्याचा उत्साह वेगळाच असतो. तो उत्साह मी मुंबईत मिस करते असं तिने सांगितलं.
-
पूर्वी नवीन कपडे घेण्यासाठी सण-उत्सवांची वाट पाहिली जायची. दिवसभर फिरून शॉपिंग करायचो. मात्र, ऑनलाइन शॉपिंगमुळे त्यातली मजा गेली आहे, असं ती म्हणते.
-
कोलकात्यात असताना वर्षभर आम्ही दुर्गा पुजेची वाट पहायचो. कुटुंबीयांसोबत खरेदी करण्यासाठी जाण्याचा पण वेगळाच आनंद असायचा, असं सायंतनी म्हणाली.
-
दुर्गा पुजा हा एकमेव सण असायचा जेव्हा रात्री उशीरापर्यंत घराबाहेर राहण्याची परवानगी मिळायची, असं ती म्हणाली.
-
अष्टमीच्या दिवशी सर्व मित्रमंडळी आम्ही खूप फिरायचो आणि स्ट्रीट फूड खायचो, अशी आठवणी सायंतनी सांगते.
-
यावेळी ती आजोबांसोबतची दुर्गा पुजेची आठवण सांगते. -
ती म्हणते, दुर्गा पुजेत आजोबांसोबत फिरायला जायचे. आम्हाला उपवास असायचा. त्यामुळे आजोबा आम्हाला पुष्पांजली देऊन फिरायला न्यायचे. तेव्हा मी आईसक्रिम खाऊन उपवास तोडायचे, असं सायंतनीने सांगितलं.
-
आईसक्रिम खाऊन उपवास तोडायचा हा ट्रेंड आम्ही नेहमी करायचो. आता आजोबा राहिले नाहीत, मात्र, त्यांच्या आठवणी आमच्यासोबत आहे, असं ती म्हणाली.
-
मी गेल्या १६ वर्षांपासून मुंबईत राहतीये. त्यामुळे बऱ्याचदा दुर्गा पुजेसाठी घरी जाण्याचा प्रयत्न असतो.
-
मात्र, कामामुळे गेल्या पाच वर्षांपासून मला दुर्गा पुजेला कोलकात्याला जाता आलं नाही, असं सायंतनी सांगते.
-
मुंबईत असले तरी अष्टमीच्या दिवशी मी सुट्टी घेते, साडी नेसते आणि दुर्जापुजेच्या पंडालला भेट देते, असं तीने सांगितलं.
-
बंगालला जाता येत नसलं तरी ओळखीतल्या बंगाली अभिनेत्री आणि मैत्रिणींसोबत दुर्गा पुजा साजरी करते, असं सायंतनी म्हणाली.
-
(सर्व फोटो सायंतनी घोषच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच