-
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही चित्रपटातील बोल्ड सीनमुळे कायमच चर्चेत असते.
-
सनी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्कात राहते.
-
पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली.
-
‘बेबी डॉल’ या आयटम साँगने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली.
-
आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारी सनी यशस्वी कलाकारांपैकी एक आहे.
-
सनीकडे देशविदेशात कोट्यावधींची संपत्ती आहे.
-
काही महिन्यांपूर्वी सनीने स्वप्ननगरी मुंबईतही स्वत:चे घर खरेदी केले आहे.
-
बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर सनी लिओनी ही बऱ्याच काळापासून भाड्याने राहत होती.
-
नुकतंच तिने तिच्या घराचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
यात सनी स्विमिंग सूट घालून घराच्या छतावरील स्विमिंग पूलचा आनंद घेताना दिसत आहे.
-
सनी लिओनी नेहमीच तिच्या नवीन घराचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
-
काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या निमित्ताने तिने घरातील गणपती पूजेचे फोटो पोस्ट केले होते.
-
सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियलचे मुंबईतील नवीन घर अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोडजवळ आहे.
-
अंधेरीतील अटलांटिक्स बिल्डींगच्या १२ व्या मजल्यावर तिने ३ बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे.
-
सनीच्या घरातील लिव्हिंग एरिया फारच मोठा असून तो फार सुंदर आहे.
-
तिच्या घरातील बहुतांश रुमचा रंग हा पांढरा आहे. त्यासोबत मॅचिंग पडदे, फर्निचर याचे तिने उत्तम कॉम्बिनेशन केले आहे.
-
सनीने खरेदी केलेल्या या फ्लॅटची किंमत जवळपास १६ कोटी रुपये असल्याचे बोललं जात आहे.
-
सनीने २०११ मध्ये डॅनिअल वेबरशी लग्न केलं. सनीच्या संपूर्ण प्रवासात डॅनिअलने तिची साथ दिली. लग्नापूर्वी काही वर्ष हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते.
-
या दोघांनी निशा या मुलीला दत्तक घेतलं. त्यानंतर सरोगसीच्या माध्यमातून त्यांना दोन मुलं झाली.
-
त्यापैकी एकाचं नाव अॅशर आणि दुसऱ्याचं नोआ आहे. पती डॅनिअल आणि तीन मुलं असं सनीचं कुटुंब आहे.

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन