-
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कपल सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय आहे.
-
अनुष्काने ११ जानेवारीला एका मुलीला जन्म दिला असून तिचे नाव वामिका आहे.
-
अनुष्का सोशल मीडियावर सक्रिय असते. ती वेगवेगळे फोटो शेअर करत नेटकऱ्यांच्या संपर्कात असते.
-
विराट-अनुष्का नेहमी त्यांच्या मुलीचे विविध फोटो शेअर करताना दिसतात.
-
नवरात्रीच्या निमित्ताने अनुष्काने नुकतंच तिच्या लेकीसोबत एक फोटो शेअर केला आहे.
-
“वामिका, तू मला दररोज शूर आणि धैर्यवान बनवत आहेस. तुला अशाचप्रकारे नेहमी देवी-देवतांचे आशीर्वाद मिळो, अष्टमीच्या शुभेच्छा, असे खास कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
-
वामिका आता नऊ महिन्यांची झाली आहे. मात्र अद्याप तिचा चेहरा दिसेल असा एकही फोटो समोर आलेला नाही.
-
विराट आणि अनुष्का हे दोघेही तिचे विविध फोटो पोस्ट करत असले तरी तिचा चेहरा यात दिसत नाही.
-
वामिकाचा चेहरा बघण्यासाठी सर्वचजण फार उत्सुक झाले आहेत.
-
ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता.

Pahalgam Terror Attack Live Update: पाकिस्ताननं भारतासाठी हवाई हद्द बंद केली, पुढे काय? केंद्रीय मंत्री म्हणतात, “जर ही परिस्थिती वर्षभर राहिली…”