-
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
-
१४ ऑक्टोबरला पार पडलेल्या सुनावणीत आर्यनला जामीन मंजूर झाला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० ऑक्टोबरला होणार असल्याने आर्यन खानला तोपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे.
-
आर्यन खान मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक कैद्याला एक नंबर दिला जातो त्यांच प्रमाणे आर्यनला ९५६ हा कैदी नंबर देण्यात आलाय.
-
तुरुंगात कैदी नंबर मिळालेल्या व्यक्तीला त्या क्रमांकाने हाक मारली जाते. त्यामुळे आता आर्यन खानला कैदी नंबर ९५६ हा नावाने पुकारलं जाईल.
-
तर मिळालेल्या माहितीनुसार आर्यन खानला जेलमध्ये ११ ऑक्टोबरला साडे चार हजार रुपयांचं मनी ऑर्डर आलं आहे.
-
आर्यनला हे पैसे त्याचे वडील म्हणजेच अभिनेता शाहरुख खानने पाठवले आहेत.
-
मनी ऑर्डरने आलेल्या या पैशांचा वापर आर्यनने कॅन्टीनमधील जेवणासाठी केला आहे.
-
आर्यन खानला जेलमधील खाणं आवडलं नाही. मात्र जेलमध्ये बाहेरील अन्न पदार्थ आणण्याची परवानगी नाही.
-
तरुंगाच्या नियमांनुसार एका कैद्याला महिन्याला फक्त साडेचार हजार रुपयांच्या मनी ऑर्डरची परवानगी आहे.
-
२ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग पार्टीच्या छाप्यात आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले.
-
आर्यन खानसह सह मूनमून धमेचा, नूपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ मर्चंट यांना केंद्रीय अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली होती.
-
आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटकडून काही प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
-
या पार्टीला अरबाज मर्चंट, आर्यन खान आणि त्याची मित्रमंडळी अमलीपदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती एनसीबीकडे होती.
-
दरम्यान, आर्यन खानसह पाच आरोपींना क्वारंटाईन बराकमधून काढून कॉमन सेलमध्ये पाठवण्यात आले आहे.
-
आर्यन आणि उर्वरित आरोपींचा कोविड अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना कॉमन सेलमध्ये पाठवण्यात आले आहे.
-
आर्यन खानच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील अनेकांनी शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाला पाठिंबा दिला आहे.
IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल