-
गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
स्टार प्रवाह वाहिनीवर ४ ऑक्टोबरपासून ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सुरु झाली आहे.
-
या मालिकेतून एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले जात असून कानिटकर कुटुंबाची ही गोष्ट आहे.
-
या मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे हा प्रमुख भूमिकेत दिसत आहे.
-
चेतन या मालिकेत शशांक कानिटकर हे पात्र साकारत आहे.
-
चेतनसोबत या मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर ही देखील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.
-
ज्ञानदा रामतीर्थकर ही या मालिकेत अपूर्वाची भूमिका साकारत आहे.
-
ज्ञानदाने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
ज्ञानदाचा जन्म २६ जून १९९५ रोजी झाला.
-
ज्ञानदाचे प्राथमिक शिक्षण हे पुण्यातील शिवाजी नगर पी. ई. एस मॉर्डन हायस्कूलमध्ये झाले आहेत.
-
त्यानंतर ज्ञानदाने पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजमधून कॉमर्स विषयात पदवी घेतली.
-
कॉलेजमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्ञानदाने अभिनय क्षेत्राचे धडे गिरवायला सुरुवात केली.
-
ज्ञानदाने सुरुवातील थिएटर आर्टिस्ट म्हणून काम केले.
-
२०१६-१७ या वर्षात ती टीव्ही इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आली आणि त्यानंतर सिनेसृष्टीतील तिच्या प्रवासाला सुरुवात झाली.
-
२०१७ मध्ये तिने ‘सख्या रे’ या मराठी मालिकेपासून अभिनय क्षेत्रामध्ये आपले पहिले पाऊल ठेवले. यात तिची वैदही ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली. प्रेक्षकांनीही तिच्या भूमिकेचे फार कौतुक केले.
-
यानंतर ‘जिंदगी नॉट आऊट’, ‘शतदा प्रेम करावे’, ‘इअर डाऊन’ यासारख्या अनेक मालिकेत विविध भूमिका साकारल्या.
-
मराठीशिवाय ‘स्टार प्लस’ या हिंदी वाहिनीवरील ‘शादी मुबारक’ या मालिकेतही तिने काम केले.
-
विशेष म्हणजे २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरळा’ चित्रपटातही तिला काम करण्याची संधी मिळाली. यात तिने दिव्या बाबर हे पात्र साकारले होते.
-
तसेच येत्या काही दिवसात ज्ञानदा ही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ आणि ‘डी ३: दिल दोस्ती धोका’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
सध्या ज्ञानदा ही ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील अपूर्वा हे पात्र साकारताना पाहायला मिळत आहे.
-
तिचे हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडताना दिसत आहे.
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच