-
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता एक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी झाली आहे. बॉलिवूडसोबतच तिने हॉलिवूडमध्येही नाव कमावलं आहे.
-
तिचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात तिने उत्कृष्ठ अभिनय केला होता.
-
या चित्रपटात प्रियांकाने पेशव्यांची पत्नी काशीबाई यांची भूमिका साकारली होती.
-
तिच्या या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले होते. या चित्रपटातील तिचे संवाद प्रचंड गाजले.
-
प्रियांकासाठी ही भूमिका तिच्या करियरमधली सर्वात अवघड भूमिका असल्याचे तिने ट्विटही केलं होतं.
-
पण फार कमी लोकांना याची माहिती असावी की बाजीराव मस्तानी या चित्रपटाचे ३ दिवस शूटींग केल्यानंतर तिने यात काम करण्यास नकार दिला होता. नुकतंच यामागचे कारण समोर आले आहे.
-
२०१५ मध्ये ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने पेशवे बाजीराव यांची भूमिका साकारली होती.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत रणवीरने याबाबतचा खुलासा केला होता.
-
‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाचे शूटींग सुरु झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात प्रियांकाने मला यात काम करायचे नाही, असे सांगितले होते.
-
तिचा हा निर्णय ऐकल्यानंतर रणवीरही फार गोंधळला होता. प्रियांकाच्या या निर्णयावर त्याला विश्वासच बसत नव्हता, असे रणवीर सिंग या मुलाखतीदरम्यान म्हणाला होता.
-
बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रियांकाला संजय लीला भन्साळींच्या अनोख्या स्वभावाची अजिबात माहिती नव्हती.
-
“नेमकं काय चालले आहे? हे खरे आहे का? हे खरोखर घडत आहे का? तुम्ही अशाप्रकारे गप्पा का मारताय? रात्रीचे नऊ वाजले आहेत आणि आम्ही एकही शॉट घेतला नाही. नेमकं काय चालले आहे?” असे बरेच प्रश्न प्रियांकाच्या डोक्यात सुरु होते.
-
यापुढे रणवीर सिंग म्हणाला की, “ती या चित्रपटासाठी तयार नव्हती. तिला संजय लीला भन्साळींसोबत कामच करायचे नव्हते. त्यांच मजेशीर स्वभावाची तिला काहीच कल्पना नव्हती.”
-
यानंतर तिसऱ्या दिवशी अचानक तिने माझे काम पूर्ण झाले आहे. मला हा चित्रपट सोडायचा आणि आता मी घरी जात आहे, असे एका क्षणात सर्वांसमोर म्हटली होती.
-
रणवीरने हा किस्सा सांगितल्यानंतर अनेकजण अवाक झाले होते.
-
बाजीराव मस्तानी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात रणवीर, दीपिकासह अभिनेत्री प्रियंका चोप्राने भूमिका साकारली होती.
-
या चित्रपटात कलाकारांनी भरपूर मेहनत घेतली असून त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुकही करण्यात आले होते.

“माकडतोंड्या, बोबडा बोलतो…सूरजचा सिनेमा फ्लॉप करायचा ठरवलं होतं”, केदार शिंदेंचा ट्रोलर्सबाबत मोठा दावा, म्हणाले…