-
छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिलं जातं. सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ वे पर्व सुरु आहे. या शोचे सुत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत.
-
यावेळी हॉटसीटवर जळगावच्या भाग्यश्री तायडे होत्या. भाग्यश्री यांनी प्रेम विवाह केल्यामुळे त्यांचे वडिलांसोबत असलेले संबंध कसे बदलले हे सांगितले. त्यावेळी अमिताभ यांनी त्यांच्या आडनावामागची कहानी सांगितली आहे.
-
अमिताभ म्हणाले, “हा मुद्दा मी वैयक्तिकरित्या घेतो. कारण माझा जन्म हा आंतरजातीय कुटुंबात झाला आहे. माझी आई शीख कुटुंबातली होती आणि वडील उत्तर प्रदेशातील कायस्थ कुटुंबातील होते.”
-
“आई-वडिलांच्या कुटुंबाने थोडावेळ विरोध केला. पण नंतर त्यांनी होकार दिला आणि त्यांच लग्न झालं. ही गोष्ट १९४२ सालातील आहे.”
-
त्यांच्या वडीलांविषयी बोलताना अमिताभ म्हणाले, “हरिवंश राय यांनी बच्चन हे आडनाव निवडलं होतं. माझ्या वडीलांनी मुद्दामुन आम्हाला बच्चन हे नाव दिले, कारण आडनाव आपली जात दाखवते.”
-
“जेव्हा मी शाळेत अॅडमिशन घेतले, तेव्हा मला माझ्या आडनावाविषयी विचारण्यात आलं होतं.”
-
“माझ्या आई-वडिलांनी जात दाखवणारं आडनाव न देण्याचं ठरवलं, पण माझे वडील कविता लिहिताना जे टोपणनाव लिहायचे ते आडनाव म्हणून देण्याचं ठरवलं. यामुळे माझी जात कळणार नाही हा त्यामागचा हेतू होता.”
-
दरम्यान, या आधी देखील अमिताभ यांनी त्यांच्या आडनावा विषयी वक्तव्यं केलं होतं. “माझे आडनाव हे कोणत्या धर्माशी संबंधित नाही कारण माझ्या वडिलांचा धर्मावरुन होणाऱ्या भेदभावाला कायम विरोध होता.”
-
“माझे खरे आडनाव श्रीवास्तव असे आहे. पण आम्ही कधीच त्यावर विश्वास ठेवला नाही. बच्चन हे आडनाव लावणारा मी माझ्या घराण्यातील पहिला सदस्य आहे आणि त्याचा मला अभिमान आहे”, असे अमिताभ म्हणाले होते.
-
“जनगणनेच्या वेळी कर्मचारी माझ्या घरी येतात आणि मला माझ्या धर्माबद्दल विचारतात तेव्हा मी कोणत्या विशिष्ट धर्माशी संबंधित नसून भारतीय असल्याचे सांगतो”, असे बिग बी पुढे म्हणाले आहेत.(All Photo Credit : File Photo)
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई