-
अभिनेत्री राधिका आपटे तिच्या दमदार आणि हटके अभिनय शैलीसाठी ओळखली जाते.
-
आजवर राधिकाने वेगवेगळ्या भूमिका साकारत स्वत:ची ओळख निर्माण केली. सिनेमांसोबतच राधिका तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजासाठी देखील ओळखली जाते.
-
राधिकाला बोल्ड लूकसह रोखठोक वक्तव्य करण्यासाठीही ओळखलं जाते.
-
नुकतंच राधिकाने एका मुलाखतीत सिनेसृष्टीतील सेलिब्रेटींबद्दल आणि फोटोबद्दल रोखठोक वक्तव्य केले आहे.
-
“सिनेसृष्टीतील सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर असणाऱ्या फोटो फिल्टरचा वापर करु नये,” असा सल्ला राधिका आपटेने दिला आहे.
-
“त्यासोबतच मला असं वाटतं की सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करणे थांबवावं. त्यापेक्षा त्यांनी नैसर्गिक सौंदर्याबद्दल बोललं पाहिजे,” असेही राधिका म्हणाली.
इतकंच नव्हे तर राधिकाने मेकअप करण्यावरुनही काही सेलिब्रेटींला टोला लगावला आहे. -
“मेकअपशिवाय माझा चेहरा कसा दिसतो, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यात लपवण्यासारखे काहीही नाही,” असे राधिका म्हणाली.
-
“कधीकधी तर मेकअप करता करता मी बोअर होते,” असा खुलासाही राधिकाने या मुलाखतीदरम्यान केला.
-
“पण फक्त ब्रँडच्या माझ्याकडून काही अपेक्षा असतात. म्हणून मी फिल्टरचा वापर करते,” असेही तिने सांगितले.
-
“यामुळे मला वारंवार मेकअप करण्याचा त्रास घ्यावा लागत नाही,” असे राधिका म्हणाली.
-
राधिकाने नुकतंच सोशल मीडियावरील ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांनाही खडे बोल सुनावले आहेत.
-
“मी कधीही माझ्या फोटोखालच्या कमेंट्स वाचत नाही. लॉकडाऊनदरम्यान मी त्या वाचल्या आणि त्यामुळे मला प्रचंड त्रास झाला.” असेही तिने सांगितले.
-
“यामुळे मला अस्वस्थ वाटत नव्हते. पण माझ्या मनात फार द्वेष आणि नकारात्मकता निर्माण झाली होती,” असेही राधिकाने सांगितले.
-
“त्यामुळे फोटोखालच्या कमेंट्स वाचणे फार त्रासदायक असते,” असेही ती म्हणाली.

“माकडतोंड्या, बोबडा बोलतो…सूरजचा सिनेमा फ्लॉप करायचा ठरवलं होतं”, केदार शिंदेंचा ट्रोलर्सबाबत मोठा दावा, म्हणाले…