-
बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सान्याचे लाखो चाहते आहेत. सान्या नेहमीच मोकळे पणाने तिच्या भावना सगळ्यासमोर मांडत असते.
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सान्याने सेक्सवर वक्तव्यं केलं आहे. यावेळी आपल्या देशात सेक्स अजुनही एक टॅबू असल्याचं म्हटलं आहे.
-
सान्याने ऑडिबलवरील ‘ससुराल वंडर फूल’ या शोमध्ये हजेरी लावली होती. सान्यासोबत वरुण शर्माने देखील हजेरी लावली होती.
-
हा शो एक रोमॅंटिक कॉमेडी शो आहे. या शोमध्ये सान्या आशिमा ही भूमिका साकारत होती.
-
यात आशिमाचे लग्न हे वरुणने साकारलेल्या एका सेक्स थेरपिस्टशी लग्न करते, जो त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत सेक्स क्लिनिक चालवतो.
-
सान्याने नुकतीच IANS ला मुलाखत दिली होती. यावेळी सान्या सेक्स या विषयावर बोलली. “सेक्स हा एक टॅबू आहे. परंतु चित्रपटांसोबत इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरमुळे गोष्टी बदलत आहे असं मला वाटतं,” असे सान्या म्हणाली.
-
“मला असं वाटतं की अशा कथांची मागणी आहे आणि म्हणूनच निर्माते हे ‘ससुराल वंडर फूल’सारखे शो तयार होत आहेत.”
-
सान्या पुढे म्हणाली, “मला आशा आहे की या शोच्या माध्यमातून आम्ही काही बदल घडवण्यासाठी सक्षम होऊ. कदाचित लोकांना सेक्स किंवा सेक्स संबंधित समस्यांबद्दल बोलताना काही वाटणार नाही.”
-
“मला असे वाटते की ‘ससुराल वंडर फूल’मधील माझी भूमिका म्हणजेच जी आशिमा आहे, ती आपल्या समाजाचे एक प्रतिनिधित्व करते, कारण तिला सेक्स विषयी बोलायला कसे तरी वाटते.”
-
त्यानंतर जेव्हा तिला नवऱ्याचं आणि तिच्या सासरच्यांच सेक्स क्लिकनिक आहे हे कळतं, तेव्हा तिला मोठा धक्काच बलतो.
-
पण मग तिच्यासाठी साहजिकच हा एक शिकण्याचा अनुभव आहे. म्हणून मला आशा आहे की प्रेक्षक तिच्याशी आणि तिच्या प्रवासाशी कनेक्ट करतील.
-
‘ससुराल वंडर फूल’ हा शो गेल्या वर्षी करोना काळात रेकॉर्ड करण्यात आला आहे.
-
सान्याने ‘दंगल’ या चित्रपटात बबिताची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली.
-
या आधी सान्या ‘लूडो’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील सान्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
-
तर सान्याचा आयुषमान खुरानासोबत असलाला ‘बधाई हो’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. (All Photo Credit : Sanya Malhotra Instagram)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…