-
-
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
-
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणार अटक करण्यात आल्यानंतर अनन्या पांडेला एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावला. अनन्यादेखील एनसीबीच्या रडारवर आल्याने अनेकांच्या भुवया उचांवल्या आहेत.
-
अनन्याला एनसीबीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगू लागल्याने अनन्या ट्रेंडमध्ये आली.
-
सोशल मीडियावर अनन्याचे भन्नाट मिम्स व्हायरल होवू लागले.
-
या आधीदेखील अनन्या अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
-
अगदी बॉलिवूडमध्ये एण्ट्री केल्यापासूनच अनन्याला नेटकऱ्यांनी अनेकदा ट्रोल केलंय.
-
अनन्याने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या करण जोहरच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. मात्र यामुळे अनन्याला ट्रोल व्हावं लागलं होतं.
-
चांगला अभिनय न करताही केवळ चंकी पांडेची मुलगी म्हणून अनन्याला पुरस्कार मिळाली असल्याची टीका अनेकांनी यावेळी केली होती.
-
तर ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे अनन्या सर्वात जास्त ट्रोल झाली होती.
-
“करण जोहरसोबत काम करणं वाटतं तितकं सोप नाही. माझ्या वडिलांनी कधीही धर्मा फिल्मस् सोबत काम केलं नाही. कॉफी विथ करण या शोमध्येही कधी आले नाही. माझे वडिल अभिनेते आहेत म्हणून मी बॉलिवूडमध्ये आलेले नाही. प्रत्येकाचा स्वत:चा प्रवास आणि संघर्ष असतो.” असं अनन्या म्हणाली होती.
-
यावर ‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी म्हणाला होता, “जिथे आमची स्वप्न पूर्ण होतात. तिथे यांचा संघर्ष सुरु होता.” सिद्धांतचं हे वक्तव्य नेटकऱ्यांना पसंत पडलं होतं. त्यानंतर त्यांनी अनन्याला चांगलच ट्रोल केलं.
-
यानंतर अनेकदा नेटकऱ्यांनी अनन्याला स्ट्रगलिंग दीदी’ म्हणत ट्रोलही केलंय.
-
अनन्याला अनेकदा नेपोटिझमवरूनही ट्रोल केलं गेलंय.
-
अनन्या पांडेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर अनेकदा नेटकरी कमेंट करून तिला ट्रोल करत असतात. यात “अभिनय कौशल्य नाही. नेपोटिझम” अशा आशयाच्या कमेंट केल्या गेल्या आहेत.
-
तर बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्यापूर्वीच अनन्याला तिच्या बारिक असण्यावरून ट्रोल करण्यात आलं होतं. अनन्याच्या व्हायरल फोटोंवर ती खूपच बारिक असून मुलासारखी तिची फिगर असल्यात्या कमेंट करण्यात आल्या होत्या.
-
तर अनन्याने ‘पती पत्नी और वो’ आणि ‘ खाली पिली’ सिनेमात काम केलं. मात्र दोन्ही सिनेमांना यश मिळालं नाही.
-
लवकरच अनन्या ‘लायगर’ सिनेमातून झळकणार आहे.
२८ फेब्रुवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटचा दिवस ‘या’ तीन राशींचे भाग्य पालटणार? कोणाला कामातून आनंद तर कोणाला अनपेक्षित लाभ होणार