-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे कौन बनेगा करोडपती. माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या शोचे सध्या १३ वे पर्व चर्चेत आहे.
-
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या कौन बनेगा करोडपतीमध्ये अनेक स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर लाखो रुपये जिंकतात.
-
नुकतंच मध्यप्रदेशातील छतरपूर या ठिकाणी राहणारे साहिल अहिरवार याचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
-
केबीसी या प्रसिद्ध शो मध्ये साहिल आदित्य अहिरवार याने एक कोटी रुपये जिंकले आहेत.
-
मात्र ७ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याला देता आले नाही. त्यापूर्वीच त्याने खेळ सोडला.
-
पण तुम्हाला माहितीय का, केबीसीमध्ये स्पर्धकांनी जिंकलेली १ कोटी ही रक्कम त्यांना पूर्ण मिळत नाही. त्यांना त्या रक्कमेवर कर भरावा लागतो.
-
कौन बनेगा करोडपतीमध्ये स्पर्धक जितके पैसे जिंकतात त्यातील काही पैसे त्यांना कर स्वरुपात भरावे लागतात.
-
जर एखाद्या स्पर्धकाने एक कोटी रुपये जिंकले तर त्याला ती रक्कम पूर्ण मिळत नाही. त्यातील काही रक्कम ही कर म्हणून भरावी लागते. चला जाणून घेऊया स्पर्धकांना केबीसीमध्ये किती रुपये कर भरावे लागतात.
-
भारतीय कर प्रणालीच्या नियमानुसार, जर केबीसीचा कोणताही स्पर्धक एक कोटी रुपये जिंकला, तर त्यातून टीडीएसची रक्कम कापली जाते. जिंकलेल्या रक्कमेतून सेक्शन १९४ B अंतर्गत ३० टक्के टीडीएस वजा केला जातो.
-
त्यामुळे जर एखादा स्पर्धक १ कोटी जिंकला असेल, तर त्याची ३० लाख रुपये रक्कम ही टीडीएस म्हणून वजा केली जाते.
-
या गणिताप्रमाणे स्पर्धकाने जिंकलेल्या १ कोटी या रक्कमेतून ३३ लाख रुपये कमी होतात.
-
मात्र टीडीएसवर लागणारा १० टक्के व्याज हा प्रत्येकाला द्यावा लागत नाही. जर एखादा स्पर्धक ५० लाख रुपयांहून अधिक रक्कम जिंकला असेल, तरच त्याला टीडीएसवर व्याज द्यावा लागतो.
-
पण जर एखादा स्पर्धक ५० लाख किंवा त्याहून कमी रक्कम जिंकला तर मात्र त्याला १० टक्के व्याज द्यावा लागत नाही.
-
टीडीएसवरील व्याजानंतर आता स्पर्धकाच्या उरलेल्या रक्कमेतून ४ टक्के रक्कम ही सेस रुपात कपात केली जाते.
-
म्हणजे ३३ लाख या कपात केलेल्या रक्कमेवर ४ टक्के सेस द्यावा लागतो. जो साधारण १ लाख ३२ हजार इतका असतो.
-
त्यामुळे स्पर्धकाची एकूण मिळून ३४ लाख ३२ हजार रुपये रक्कम कपात होते. हे सर्व पैसे कपात झाल्यानंतर आता स्पर्धकाकडे केवळ ६५ लाख ६८ हजार रुपये शिल्लक राहतात.
-
त्यामुळे एक कोटी रुपये जिंकलेल्या स्पर्धकाला जवळपास ३४.५ लाख रुपये कर भरावा लागतो.
-
यामुळे स्पर्धकाला केवळ ६५ लाख रुपये घरी घेऊन जातो. केबीसीमध्ये १० हजार रुपये जिंकलेल्या स्पर्धकाला देखील कर भरावा लागतो.

VIDEO: विराट कधीच विसरत नाही! विजयानंतर राहुलला ‘हे माझं ग्राऊंड’ सेलिब्रेशन करत चिडवलं; सर्वांसमोर उडवली खिल्ली